ji24news

पालघरच्या वारली कलाकाराचा लंडनमध्ये डंका.

पालघरच्या वारली कलाकाराचा लंडनमध्ये ….. खुशाल जैन: पालघर जिल्ह्यातील वारली चित्रकार रमेश हेंगाडी यांनी आपल्या कलेचा डंका थेट लंडनमध्ये वाजवला आहे. लोककला, लोकवाद्ये आणि वारली चित्रशैली जतन करण्यासाठी बांगला नाटक डॉट कॉम आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने लोक कलाकारांच्या कलांना प्रोत्साहन देण्यासाठी उपक्रम हाती घेण्यात आला असून त्याअंतर्गत कासा (डहाणू) जवळ राहणाऱ्या रमेश हेंगाडी यांनी लंडनमध्ये भरविलेल्या प्रदर्शनामध्ये त्यांच्या वारली चित्रांना लंडनवासीयांनी भरभरून प्रतिसाद दिला.महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने बांगला नाटक डॉट कॉमच्या च्या सहकार्याने ऑक्टोबर २०२४ पासून पालघर आणि नाशिक जिल्ह्यांमध्ये लोककलांचा सांस्कृतिक वारसा जतन करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. लोककलांच्या जतनाबरोबरच स्थानिक पर्यटनाला चालना देण्याचा देखील पर्यटक विकास महामंडळाचा हेतू होता. त्याचबरोबर ग्रामीण आणि आदिवासी समुदायांमधील १००० हून अधिक पारंपरिक कलाकार आणि कारागिरांसाठी उपजीविकेच्या संधी उपलब्ध होतील असा हेतू होता.बांगला डॉट कॉमने आतापर्यंत ४०० कलाकारांना आपल्या लोककला, हस्तकला, वारली चित्रकला जगाच्या व्यासपीठावर नेण्यासाठी प्रशिक्षण कार्यशाळा घेतल्या असून याला आता यश मिळत आहे. पालघरमध्ये डहाणू आणि तलासरी तालुक्यांमध्ये, तर नाशिकमध्ये सुरगाणा तालुक्यात हे उपक्रम राबवले जात आहेत. यात वारली चित्रकला, बोहाडा मुखवटा बनवणे, बांबू हस्तकला आणि तारपा, कांबडे, ठाकर, सांबळ, होडी आणि पावरी यांसारख्या लोककला परंपरा तसेच संबंधित संगीत प्रकारांचे जतन आणि प्रोत्साहन यांचा समावेश आहे.कोलकाता आणि गोवा येथे प्रमुख उत्सवांमध्ये वारली कलाकारांनी कला सादर केल्यानंतर पालघर जिल्ह्यातील वारली कलाकार रमेश हेंगाडी यांनी नुकतेच लंडनमध्ये ११ दिवसांचा सांस्कृतिक दौरा केला. तिथे त्यांनी आपल्या वारली चित्रांचे प्रदर्शन भरवले असता याला लंडनवासीयांनी भरभरून प्रतिसाद दिला.रमेश हेंगाड यांच्याकडून संस्कृतीचे जतनकासा जवळील बापूगाव येथे राहणारे रमेश हेंगाडी (४८) यांचे एमए पर्यंत शिक्षण झाले असून हे लहानपणीपासून वारली चित्र काढत आहेत. त्यासोबत सामाजिक क्षेत्रात त्यांची महत्वपूर्ण योगदान असून कला क्षेत्रात नवीन पिढी घडावी तसेच इतर कलाकाराला माहिती व्हावी म्हणून कार्यशाळा व मार्गदर्शन शिबिरांमध्ये ते सहभागी होत आहेत. इंग्लंडमध्ये यापूर्वी त्यांची दोन वेळा चित्रकले विषयी प्रदर्शन झाले असून यावेळी पारंपारिक आदिवासी वस्तू तसेच बांबू लाकूड पासून बनवलेले लॅम्प शेड, वॉल हैंगिंग, पेन स्टँड व लाकडाच्या वस्तूंचा प्रदर्शनामध्ये समावेश केला होता. याच बरोबरीने तारपा वाद्य, तारपा वाद्याची छोटी प्रतिकृती व तारपा किचेन अशा वस्तू देखील त्यांनी प्रदर्शनात ठेवल्या होत्या. आदिवासी समाजाचा सांस्कृतिक ठेवा व त्याविषयी प्रदर्शनामध्ये अनेक नागरिकांनी तपशीलवार माहिती घेतल्याचे रमेश हेंगाडी यांनी लोकसत्ता ला सांगितले. आदिवासी संस्कृती विषयी आपण अनेक लेख लिहिले असून त्या सदर्भातील पुस्तक प्रकाशन करीत असल्याची माहिती त्यांनी दिली.

ji24news
Author: ji24news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Panchang

Gold & Silver Price

Top News

Advertisement

Our Visitor

0 1 0 8 2 8
Total Users : 10828

Covid Update

जि.प.उच्च प्राथ.शाळा बांधण शाळेत अक्षरधारा फाउंडेशन ट्रस्ट मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेतील होतकरू व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक शाहित्य.

आदिवासी हक्क संघर्ष समितीच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात संपन्न…

20 वर्षांपासून पुलाची प्रतीक्षा; हिरडपाडा ग्रामस्थांचा मतदान बहिष्काराचा इशारा.लेंडी नदीवरील कायमस्वरूपी पुलासाठी दोन दशकांचा संघर्ष; ८ हजार नागरिकांचा प्रश्न ऐरणीवर

अल्ट्रा चॅम्पियन ” विशाल वळवीच्या उत्कृष्ट कामगिरीचा आदिवासी बांधवांकडून सन्मान.

अतिवृष्टीमुळे सांबरपाड्याचा एकमेव रस्त्यावर दरड कोसळून; ग्रामस्थांची मोठी गैरसोय, आमदारांना दिलेल्या निवेदनानंतरही कार्यवाही नाही

विक्रमगड आठवडे बाजाराला भरभरून प्रतिसाद मात्र शौचालयाची असुविधा – जनतेसाठी मोठा प्रश्न ?

मोखाडा तालुक्यातील १० वी-१२ वी च्या विद्यार्थ्यांना आनंददायी परीक्षेसाठी वैशाली पाटील यांचे मार्गदर्शन.

रोमहर्षक सामन्यात के के किंग 11संघाची बाजी.

दुसऱ्या फ्रीस्टाईल स्केट कार्टींगच्या नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये मोखाडा तालुक्यातील गाडर भगिनींनी पटकवाले दोन गोल्ड व एक ब्रॉन्झ मेडल्स.

पालघर: एसटीच्या लहरी कारभारामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात; परीक्षेलाही पोहोचण्यास होतोय उशीर