
आदिवासी विकास हक्क संघर्ष समितीचे अध्यक्ष प्रदिप वाघ यांनी मोखाडा तहसीलदार यांच्यासोबत केली महत्वपूर्ण प्रश्नांवर चर्चा. मोखाडा – सचिन वझरे आदिवासी विकास हक्क संघर्ष समितीचे अध्यक्ष तथा माजी उपसभापती – प्रदिप वाघ ( पंचायत समिती मोखाडा ) यांनी मोखाडा तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी – गमन गावित यांची भेट घेवून तालुक्यातील भेडसावणाऱ्या महत्त्वपूर्ण प्रश्नांवर चर्चा केली आहे. शालेय विद्यार्थी तसेच नागरिक यांना आधारकार्ड केंद्राच्या अभावी मोठा गैरसोयीचा सामना करावा लागतो. त्यामुळे खोडाळा आणि मोखाडा येथे तात्काळ आधारकार्ड केंद्र लवकरात लवकर सुरू करावे. बँक खातेदारांना अनेक गैरसोय होत असल्याने तालुक्यातील बँकांच्या अधिकाऱ्यांची बैठक बोलवण्यात यावी. भातशेतीवर बगळ्या रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे त्यामुळे तालुक्यातील शेकडो एकर भातशेती धोक्यात आली असून त्या अनुषंगाने कृषी विभाग व महसूल विभागाने पाहणी करून तात्काळ उपाय योजना करून तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासा द्यावा. तालुक्यातील ज्या गावांमध्ये रस्ते नाहीत अथवा कच्चे रस्ते आहेत अशा नागरिकांच्या समस्या लक्षात घेवून तातडीने रस्त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी वरिष्ठांकडे पत्रव्यवहार करावा. अशा अनेक महत्त्वाच्या प्रश्नांवर चर्चा करण्यात आली.यावेळी नायब तहसीलदार – श्री.भला हे देखील उपस्थित होते.
Total Users : 10829