
विक्रमगड प्रथम एज्युकेशन फाउंडेशन तर्फे लहान मुलांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन…. प्रतिनिधी- दिपक भोये विक्रमगड तालुक्यामध्ये हमारा गाव उपक्रम अंतर्गत गणेशोत्सव निमित्ताने विविध गावात मुलांच्या स्पर्धा घेण्यात आल्या. गावातील स्वयंसेवक/गणेश मंडळ यांच्या माध्यमातून गावात मुलांना स्पर्धे विषयी माहिती देऊन कोण कोणत्या स्पर्धा घेणार आहोत या विषयी त्या गावात स्वयंसेवक किंवा माता गट यांच्या माध्यमातून मुलांपर्यंत सांगणे. व तशी मुले तयारी करून विविध स्पर्धा मध्ये भाग घेण्यास तयारीत राहायचे. यामध्ये चित्रकला स्पर्धां, पाने _फुले यांच्या पासून रांगोळी स्पर्धा, वेगवेगळे खेळ घेण्यात आले. त्यामुळे मुलांमधील एक आत्मविश्वास वाढून त्याविषयी आवड निर्माण होताना दिसत आहे. हा उपक्रम घेण्यासाठी प्रथमचे जिल्हा समन्वयक प्रदिप वारंगडे, सविता कोरडा, मुकेश लहांगे, नितेश काकड, पूनम कुऱ्हाडा, सुवर्णा वावरे, रविना फरारा, दिलदार फडवले, हेमंत मेथवाले, राजेश तारवी, भावेश खरपडे, गावातील सरपंच, गावातील गणेश मंडळ, माता पालक, स्वयंसेवक परिश्रम घेत आहेत.

Total Users : 10829