
गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप. विक्रमगड प्रतिनिधी – प्रशांत दाव्हाड. विक्रमगड*- जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्था झडपोली यांच्या संयुक्त विद्यमाने जि.प.उच्च.प्राथ शाळा डोल्हारी बुद्रूक शाळेत दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा शाळेतील गरीब गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य मधील शाळेतील एकूण 203 विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आल्या.तसेच मा.नगराध्यक्ष श्री.रविंद्र खुताडे साहेब यांनी शाळेतील होतकरू विद्यार्थ्यांना भविष्यवेधी मोलाचे मार्गदर्शन केले. या वह्या वाटप कार्यक्रमाप्रसंगी जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्थेचे पदाधिकारी विक्रमगड तालुका माजी नगराध्यक्ष श्री.रविंद्र खुताडे साहेब, नगरसेवक श्री.फडवळे साहेब, श्री.प्रदीप डोंगरकर ,शरद मेघवाली तसेच शाळेचे मुख्याध्यापक श्री.विलास चौधरी , श्री.चंद्रकांत भुसारा ,सौ.मेघा ठाकरे, श्री.विष्णू उमतोल, शिक्षक श्री.संतोष उमतोल , श्री.प्रशांत महाले, श्री.विनोद पानतले व ग्रामस्थ उपस्थित होते.
Total Users : 10829