ji24news

अतिवृष्टीमुळे पालघर जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेत पिकांचे त्वरित पंचनामे करुन आर्थिक मदत करा – खासदार डॉ. हेमंत सवरा.

अतिवृष्टीमुळे पालघर जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेत पिकांचे त्वरित पंचनामे करुन आर्थिक मदत करा - खासदार डॉ. हेमंत सवरा.     पालघर - खासदार डॉ. हेमंत सवरा यांनी मुख्यमंत्री व पालक मंत्री श्री. गणेश नाईक यांच्या कडे तात्काळ मदतीची मागणी पत्राद्वारे केली आहे.       पालघर जिल्ह्यांमध्ये २७ व २८ सप्टेंबर २०२५ रोजी झालेल्या चक्रीवादळसदृश अतिवृष्टीमुळे अनेक भागांत पूर परिस्थिती निर्माण झाली होती परिणामी नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले होते. अनेक शेतकऱ्यांचे संपूर्ण पीक पाण्याखाली गेले असून त्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.            या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर खासदार डॉ. हेमंत विष्णु सवरा यांनी मुख्यमंत्री मा. ना. श्री. देवेंद्र फडणवीस व पालघर जिल्ह्याचे पालक मंत्री मा. श्री. गणेश नाईक यांच्याकडे तात्काळ मदतीसाठी लेखी मागणी केली आहे. त्यांनी पत्राद्वारे खालील तातडीच्या मागण्या मांडल्या आहेत-.1. पालघर जिल्ह्यांतील पूरग्रस्त व नुकसानग्रस्त भागांचे त्वरित पंचनामे करण्यात यावेत. 2. शेतकरी आणि नागरिकांना तातडीने आर्थिक मदत तसेच पुनर्वसनाची सुविधा पुरवावी. 3. आवश्यक तरतुदी करून मदत कार्य जलदगतीने सुरू करावे.4. प्रभावित भागात आरोग्य सुविधा,      अन्नपाणी, निवारा व पुनर्वसनासाठी आवश्यक उपाय त्वरित राबवावेत.         या पत्रामधील मागण्यांमुळे शेतकऱ्यांना तात्काळ मदत करता येईल व बाधित शेतकऱ्यांना नक्कीच दिलासा मिळेल असा आशावाद खासदार डॉ. सवरा यांनी व्यक्त के

ला आहे.

ji24news
Author: ji24news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Panchang

Gold & Silver Price

Top News

Advertisement

Our Visitor

0 1 0 8 2 9
Total Users : 10829

Covid Update

जि.प.उच्च प्राथ.शाळा बांधण शाळेत अक्षरधारा फाउंडेशन ट्रस्ट मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेतील होतकरू व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक शाहित्य.

आदिवासी हक्क संघर्ष समितीच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात संपन्न…

20 वर्षांपासून पुलाची प्रतीक्षा; हिरडपाडा ग्रामस्थांचा मतदान बहिष्काराचा इशारा.लेंडी नदीवरील कायमस्वरूपी पुलासाठी दोन दशकांचा संघर्ष; ८ हजार नागरिकांचा प्रश्न ऐरणीवर

अल्ट्रा चॅम्पियन ” विशाल वळवीच्या उत्कृष्ट कामगिरीचा आदिवासी बांधवांकडून सन्मान.

अतिवृष्टीमुळे सांबरपाड्याचा एकमेव रस्त्यावर दरड कोसळून; ग्रामस्थांची मोठी गैरसोय, आमदारांना दिलेल्या निवेदनानंतरही कार्यवाही नाही

विक्रमगड आठवडे बाजाराला भरभरून प्रतिसाद मात्र शौचालयाची असुविधा – जनतेसाठी मोठा प्रश्न ?

मोखाडा तालुक्यातील १० वी-१२ वी च्या विद्यार्थ्यांना आनंददायी परीक्षेसाठी वैशाली पाटील यांचे मार्गदर्शन.

रोमहर्षक सामन्यात के के किंग 11संघाची बाजी.

दुसऱ्या फ्रीस्टाईल स्केट कार्टींगच्या नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये मोखाडा तालुक्यातील गाडर भगिनींनी पटकवाले दोन गोल्ड व एक ब्रॉन्झ मेडल्स.

पालघर: एसटीच्या लहरी कारभारामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात; परीक्षेलाही पोहोचण्यास होतोय उशीर