ji24news

खासदार डॉ. हेमंत विष्णु सावरा आयोजित, पालघर सांसद खेल महोत्सव- 2025 मध्ये कु. तनुश्री विष्णू गाडरने केली पदकांची लयलूट.

खासदार डॉ. हेमंत विष्णु सावरा आयोजित, पालघर सांसद खेल महोत्सव- 2025 मध्ये कु. तनुश्री विष्णू गाडरने केली पदकांची लयलूट. . पालघर – सचिन वझरे . पालघर जिल्ह्याचे खासदार डॉ. हेमंत विष्णु सवरा यांच्या आयोजनाने पालघर येथे ‘ सांसद खेल महोत्सव -2025 ’ मोठ्या उत्साहात पार पडला. या सांसद खेल महोत्सवाचा मुख्य उद्देश “ फिट इंडिया कार्यक्रम, खेळो इंडिया ” या योजनेंतर्गत युवक-युवतींमध्ये खेळाची आवड निर्माण करून शारीरिक आरोग्य आणि संघभावना जागृत करणे असा होता. पालघर येथील सांसद खेल महोत्सव आर्यन हायस्कूल – पालघर यांच्या प्रांगणात येथे 3 नोव्हेंबर ते 6 नोव्हेंबर रोजी संपन्न झाला. यामध्ये धावणे, कबड्डी, खो -खो, लांब उडी, योग इत्यादी क्रीडा प्रकारांमध्ये हजारो खेळाडूंनी सहभाग घेतला होता. पालघरच्या या सांसद खेल महोत्सवामध्ये मोखाडा तालुक्यातील मौजे घानवळच्या कु. तनुश्री विष्णु गाडर हिने चार क्रीडा प्रकारांमध्ये सहभाग नोंदवून तीन सुवर्ण तर एक रौप्य पदक अशा ऐकूण चार पदकांची लयलूट केली आहे. कु. तनुश्री हिने स्पर्धेत प्रभावी आणि चमकदार कामगिरी करताना 100 मिटर्स धावणे, 400 मिटर्स धावणे आणि लांब उडी यामध्ये तीन सुवर्ण पदके पटकावली तर 2000 मिटर्स धावणे मध्ये रौप्य पदक पटकावले आहे. कु.तनुश्री विष्णू गाडरच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल तिला पालघरचे खासदार आणि पालघर सांसद खेल महोत्सवाचे आयोजक डॉ. श्री. हेमंत विष्णु सवरा तसेच पालघर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष – प्रकाश कृष्णा निकम यांच्या हस्ते सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र आणि रोख बक्षीस देऊन सन्मानीत करण्यात आले आहे. पालघर जिल्हा प्रामुख्याने सागरी किनारपट्टी व डोंगर-दऱ्यांचा असून येथील खेळाडू हे अत्यंत काटक, चपळ आणि प्रतिभासंपन्न असून त्यांना योग्य व्यासपीठ आणि प्रशिक्षण मिळाल्यास ते नक्कीच पालघर जिल्ह्याचे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये नाव उंचावतील यात शंका नाही. असे मत बक्षीस वितरण समारंभाप्रसंगी खासदार डॉ. हेमंत सावरा यांनी व्यक्त केले. पालघर जिल्ह्याच्या या सांसद खेल महोत्सवास पोलीस अधीक्षक – यतिश देशमुख यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली होती.

ji24news
Author: ji24news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Panchang

Gold & Silver Price

Top News

Advertisement

Our Visitor

0 1 0 8 2 8
Total Users : 10828

Covid Update

जि.प.उच्च प्राथ.शाळा बांधण शाळेत अक्षरधारा फाउंडेशन ट्रस्ट मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेतील होतकरू व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक शाहित्य.

आदिवासी हक्क संघर्ष समितीच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात संपन्न…

20 वर्षांपासून पुलाची प्रतीक्षा; हिरडपाडा ग्रामस्थांचा मतदान बहिष्काराचा इशारा.लेंडी नदीवरील कायमस्वरूपी पुलासाठी दोन दशकांचा संघर्ष; ८ हजार नागरिकांचा प्रश्न ऐरणीवर

अल्ट्रा चॅम्पियन ” विशाल वळवीच्या उत्कृष्ट कामगिरीचा आदिवासी बांधवांकडून सन्मान.

अतिवृष्टीमुळे सांबरपाड्याचा एकमेव रस्त्यावर दरड कोसळून; ग्रामस्थांची मोठी गैरसोय, आमदारांना दिलेल्या निवेदनानंतरही कार्यवाही नाही

विक्रमगड आठवडे बाजाराला भरभरून प्रतिसाद मात्र शौचालयाची असुविधा – जनतेसाठी मोठा प्रश्न ?

मोखाडा तालुक्यातील १० वी-१२ वी च्या विद्यार्थ्यांना आनंददायी परीक्षेसाठी वैशाली पाटील यांचे मार्गदर्शन.

रोमहर्षक सामन्यात के के किंग 11संघाची बाजी.

दुसऱ्या फ्रीस्टाईल स्केट कार्टींगच्या नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये मोखाडा तालुक्यातील गाडर भगिनींनी पटकवाले दोन गोल्ड व एक ब्रॉन्झ मेडल्स.

पालघर: एसटीच्या लहरी कारभारामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात; परीक्षेलाही पोहोचण्यास होतोय उशीर