
दुसऱ्या फ्रीस्टाईल स्केट कार्टींगच्या नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये मोखाडा तालुक्यातील गाडर भगिनींनी पटकवाले दोन गोल्ड व एक ब्रॉन्झ मेडल्स
इंटरनॅशनल चॅम्पियनशिपमध्ये युरोप खंडातील बेलारुस येथे करणार भारताचे प्रतिनिधित्व
सचिन वझरे
जागतिक रोलर सर्फ फेडरेशनशी संलग्न आणि रोलर सर्फ आशियाचे सदस्य असलेल्या रोलर सर्फ इंडिया आयोजित, दुसऱ्या फ्रीस्टाईल स्केट कार्टींग नॅशनल चॅम्पियनशिप स्पर्धा मुंबईमधील सायन येथे इंटरनॅशनल स्केटिंग रिंकवर पार पडल्या. या स्पर्धेत लहान - लहान वळणे असल्यामुळे स्केटिंगवर वेगाबरोबरच नियंत्रणदेखील खुप महत्वाचे असते. स्केटर्सचे वळणांवर अथवा ठरलेल्या मार्गावर नियंत्रण सुटल्यास स्केटर्स स्पर्धेतून बाद ठरवला जातो.
या स्पर्धेत कु. दक्षतनया रामदास गाडर हिने 14 वर्षांवरील वयोगटात महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व करताना शॉर्ट रेस व लॉन्ग रेसमध्ये महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व करताना दोन गोल्ड मेडल्स पटकावले आहेत.
तसेच कु.उत्कर्षा रामदास गाडर हिने 14 वर्षे वयोगटात महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व करताना लॉन्ग रेसमध्ये ब्राँझ मेडल तर शॉर्ट रेसमध्ये पात्रता फेरीनंतर फायनल रेसमध्ये घसरून पडल्यामुळे केवळ एकाच मेडल्सवर समाधान मानावं लागलं आहे. या नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये मध्यप्रदेश, तेलंगणा, हरियाणा, दिल्ली, गुजरात, तसेच महाराष्ट्रातील शहरी व ग्रामीण भागातील अनेक स्केटर्स सहभागी झाले होते.
या पुढील स्पर्धा अर्थात फ्रीस्टाईल स्केट - कार्टींग इंटरनॅशनल चॅम्पियनशिप ही युरोप खंडातील बेलारुस देशाच्या मोगिलेव्ह या ऐतिहासिक शहरात जुन 2026 मध्ये होणार आहे . या स्पर्धेत गाडर भगिनी भारत देशाचे प्रतिनिधित्व करणार आहेत.
गाडर भगिनी या आदिवासी बहुल मोखाडा तालुक्यातील घानवळ गावच्या असून त्यांच्या या फ्रीस्टाईल स्केट कार्टींग प्रोफेशनल स्पीड इनलाईन स्केटिंगमधील यशामुळे पालघर जिल्ह्याबरोबरच महाराष्ट्र राज्याचे नाव देश पातळीवर उंचावले आहे. त्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. तसेच या अगोदर देखील त्यांनी प्रोफेशनल स्पीड इन लाईन स्केटिंग स्पर्धांमध्ये राज्य,राष्ट्र तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर नाव उंचावलेले आहे. सध्या त्या कल्याण - टिटवाळा येथे सागर स्केटिंग अकॅडमीमध्ये मुख्य प्रशिक्षक कुलदीप सागर व दिपक सागर यांच्या मार्गदर्शनाखाली स्केटिंगची तंत्रे आत्मसात करून असून सातत्याने सराव करत आहेत.
Total Users : 10828