
रोमहर्षक सामन्यात के के किंग 11संघाची बाजी.
विक्रमगड प्रतिनिधी – प्रशांत दाव्हाड
*विक्रमगड* : तालुक्यातील साखरे ग्रामपंचायत अंतर्गत साखरे प्रीमियर लीगचे आयोजन करण्यात आले होते.अतिशय निकोप वातावरणात ही लीग खेळवण्यात आली. अतिशय सुनियोज मंडळामार्फत करण्यात आले होते. ह्या स्पर्धेमध्ये अकरा संघांनी सहभाग नोंदवला. जवळ पास हे सामने दहा दिवस चालले आणि अंतिम च्या दिवशी सुपर फोर चे सामने खेळवण्यात आले.या सुपर फोर मध्ये के के आर किंग 11,शिवरायांचे मावळे, एस एम एस 11,एम आर एस 11 या संघांनी मोठया दिमाखत प्रवेश केला. फायनलच्या सामन्यामध्ये के के आर किंग 11व शिवरायांचे मावळे यांच्या मध्ये अतीटटीची लढत पहावायला मिळाली अश्या या रोमहर्षक सामन्यामध्ये अंतिम विजेता व सरपंच चषक चे मानकरी हे के के आर किंग 11 ने बाजी मारली. तर शिवरायांचे मावळे विजयाला हुलकवानी देत उपवेजेते ठरले.तृतीय क्रमांकाचे मानकरी एस एम एस 11 तर चतुर्थ क्रमांकचे मानकरी हे एम आर एस 11 हे संघ ठरले.डॉ. तुषार राऊत हे मॅन ऑफ द सिरीज चे मानकरी ठरले. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ग्रामपंचायत सदस्य रोहित गावित यांनी हा मान मिळवला.उत्कृष्ट गोलंदाज चे मानकरी प्रविण कोंब तर उत्कृष्ट फलंदाज सुधीर भडांगे यांनी हा ‘किताब फटकावला. तसेच विजयी संघातील प्रत्येक खेळाडूला मेडल देऊन सन्मातीत करण्यात आले.ह्या लीग साठी अनेक मान्यवरांचे सहकार्य लाभले त्यांचे मंडळाच्या वतीने आभार मानले. या स्पर्धेला अनेक मान्यवरानी भेटी दिल्या व खेळाडूंचे मनोबल वाढवले. बक्षीस वितरण हे गावचे सरपंच नीता वाघेरा व ग्रामसेविका सुनिता काळे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी प्रभाकर डंबली,मोतीराम शिंदे,तुंबडा डॉ.तुषार राऊत ग्रामपंचायत सदस्य दिनेश खरपडे व रोहित गावित महेश भडांगे उपस्तित होते ही लीग उत्तमरित्या पार पाडण्यासाठी संदेश तुंबडा व त्यांच्या सहकार्यांनी अतोनात मेहनत घेतली.
Total Users : 10828