
वार बुधवार दिनांक 20/4/2022 रोजीची घटना घडली आहे
गरोदर माताचे नाव दुर्गा मनोहर भोये तिला 5 महिना चालू आहे. तिच्या पोटात अचानक कळ आली सन्ध्याकाळी 4.5 वाजता त्या वेळी 108/102 फोन केला होता तेव्हा पहिला फोन उचलला आणि लगेच कट केला आणि नंतर परत फोन केला मग बोलले की गाडी पाठवतो, आम्ही लगेच घरून निघालो तरी पण गाडी आली नाही सुमारे 3.km पायपीट करावी लागली .तेव्हा मी परत 108 ambulance la फोन केला तरी सुधा गाडी निघाली नव्हती मग मी बोललो की गाडी तुम्ही पाठवता की नाय मग बोलले की गाडी पाठवतो तेव्हा आम्हाला 4 km पायपीट करावी लागली मग गाडी आली पाहिले असे प्राथमिक रुग्णालयात पाठवले नंतर मोखाडा रुग्णालयात दाखल करण्यात करण्यात आले.
राज्यात, देशात कितीही विकासाच्या गप्पा मारल्या तरी अद्यापही अनेक ठिकाणी मूलभूत सुविधा पोहोचल्या नसल्याने सर्वसामान्यांना त्याचा त्रास भोगावा लागतो. असाच प्रकार पालघर जिल्ह्यातील आदिवासी भागात घडला आहे.गर्भवती महिलेला वेदना होऊ लागल्यानंतर दुर्गम भागात रस्ताच नसल्याने या महिलेला तब्बल चार किलोमीटर डोलीत टाकून रुग्णालयात आणावे लागले. याचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे.
जिल्ह्यातील आदिवासी दुर्गम भागात पुन्हा एकदा हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मोखाडा तालुक्यातील मुकुंदपाडा येथे गावाला जोडणारा रस्ता नसल्याने गरोदर महिलेला डोलीत घेऊन चार किलोमीटरची पायपीट करणाऱ्या कुटुंबाचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. जिल्ह्यातील आदिवासी दुर्गम भागात आरोग्य व्यवस्था आणि दळणवळणाच्या साधनांचा अभाव यामुळे पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे.
रस्ता नसल्याने डोलीतून गरोदर महिलेला दाखल करण्यात आले रुग्णालयात : मोखाडा तालुक्यापासून ४० किलोमीटर अंतरावर डोंगरात मुकुंदपाडा वसलेला असून या गावातील दुर्गा मनोहर भोये या पाच महिन्याच्या गरोदर महिलेच्या पोटात बुधवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास अचानक असह्य वेदना सुरू झाल्या. मात्र गावाला जोडणारा मुख्य रस्ता नसल्याने रस्त्यापर्यंत नेण्यासाठी गरोदर महिलेच्या कुटुंबाला चार किलोमीटर पायपीट करावी लागली. त्यानंतर या महिलेला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.रस्ता नसल्याने गरोदर मातेची चार किलोमीटरपर्यंत डोलीतून फरफट
प्रशासन व लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष : मोखाडा येथील या घटनेमुळे पुन्हा एकदा घटनेमुळे मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या पालघर जिल्ह्यातील आदिवासी दुर्गम भागातील भीषण वास्तव समोर आले आहे. यापूर्वी देखील पालघर जिल्ह्यातील आदिवासी दुर्गम भागात आरोग्य व्यवस्था आणि दळणवळणाच्या साधनांचा अभाव असून, अनेकवेळा गरोदर महिलांचे असे हाल झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. प्रशासनाची अनास्था आणि लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत असल्याचे अशा घटनांमधून वारंवार दिसून येत आहे.
मोखाडा ;- नरेश भोये [ मुकुंदपाडा ग्रामस्थ ].
Total Users : 10829