
निसर्गातील मधमाश्या वाचवा….
????????????????????????????????????????????
आपल्याला माहीत आहे की मधमाशी परागीभवन करून फुलाचे फळात रूपांतर करण्यासाठी महत्वाची भूमिका बजावते. मात्र आधुनिक शेती तंत्रात उदा. अनियंत्रित कीडनाशकांचा वापर, अनावश्यक कीडनाशक वापर, तन नाशकांचा वापर आणि मधासाठी मानवाकडून मधमाश्यांची हत्या या व अशा विविध कारणांमुळे निसर्गातील आग्या, फुलोरी, सातेरी आणि कोत्या माश्याची वसतीस्थान नष्ट होत चालली आहेत. असे होत राहिले तर भविष्यात पीक उत्पादन खूप मोठ्या प्रमाणात कमी होईल.
काय केले पाहिजे:
१) निसर्गातील मध पोळे वाचवा. मधासाठी त्यांची हत्या थांबवा.
२) मधमाशी ला आवश्यक फुलोरा उपलब्ध करून द्या.
३) त्यासाठी बांधावर तेल बिया (मोहरी, जवस, खुरसानी, तीळ ई) सतत लावा.
४) बांधावर तन नाशकाचा वापर थांबवा, अनेक प्रकारची गवते नष्ट होत आहेत. त्यातून मध माशी ला पराग आणि मकरंद उपलब्ध होत असतो.
६) बांधावर मधुप्रिय जंगली झाडांची व वेलींची लागवड करा. ज्यातून कायम मध माशी ला अन्न मिळत राहील.
७) आग्या आणि फुलोरी मधमाशी वसाहती पासून मध काढताना शास्त्रीय आणि अहिंसक पद्धतीचा वापर करा.
प्रा. उत्तम सहाने
पीक संरक्षण तज्ञ
कृषी विज्ञान केंद्र, कोसबाड हील, ता. डहाणू, जिल्हा पालघर

Total Users : 10829