
तक्षशिला विद्यालय ( माध्यमिक) व ज्युनिअर कॉलेज – उल्हासनगर येथे बोर्ड प्रमाणपत्र परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ संपन्न…
जोहार इंडिया 24 न्यूज( प्रतिनिधी )
एस.एस.सी आणि एच.एस. सी बोर्ड परीक्षेत गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांना पुढील उज्ज्वल वाटचालीस प्रेरणा मिळावी म्हणून महामहिंद इंटरनॅशनल धम्मदीप सोसायटीच्या तक्षशिला विद्यालय (माध्यमिक ) व कनिष्ठ महाविद्यालयात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ दि. 20/06/2022 रोजी आयोजित करण्यात आला होता. या सत्कार समारंभाची सुरवात भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून लेझीम पथकाच्या नृत्याविष्काराने झाली. सत्कार समारंभाच्या अध्यक्षस्थानी महामहिंद इंटरनॅशनल धम्मदीप सोसायटीचे उपाध्यक्ष आयु. डी. बी. इंगळे साहेब हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते तर संस्थेचे महासचिव आयु.राजेशजी वानखेडे साहेब व सहसचिव आयु.प्रशांतजी धांडे साहेब हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका आयु. सुनंदा गाडगे मॅडम यांनी केले. एस.एस.सी बोर्ड प्रमाणपत्र परीक्षेत विद्यालयातून प्रथम येणारे कु.स्नेहल संदीप गायकवाड ( मराठी माध्यम ) – 92.00 % व कु. बुद्धभूषण रमेश सोनवणे ( इंग्रजी माध्यम)- 91.00 % तर एच. एस. सी.बोर्ड प्रमाणपत्र परीक्षेत ज्युनियर कॉलेज मधून प्रथम येणारे कु.अपेक्षा विश्वास कदम (आर्टस् )- 72.17% , कु. दीक्षा मुकेश जाधव (कॉमर्स )- 67.33% व हेमा ईश्वर डीकोंडा ( सायन्स )- 67.83% या गुणवंतांबरोबरच कु.मनोज प्रवीण पाटील, कु.निकिता प्रकाश चौधरी (आर्टस् ) रितेश इंगळे, साक्षी सूर्यवंशी, तन्मय राव, स्नेहल गायकवाड (कॉमर्स ), धम्मदीप वाठोरे , क्षितिजा सूर्यवंशी (सायन्स ) तर एस.एस. सी. परीक्षेत समीक्षा वानखेडे, वैष्णवी खुळपे ( मराठी माध्यम ), आर्यन बंगाळे, अमन शेख ( इंग्रजी माध्यम) या गुणवंत विद्यार्थ्यांना कार्यक्रमाचे अध्यक्ष आयुष्यमान डी बी इंगळे साहेब,कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे राजेशजी वानखेडे साहेब व प्रशांत धांडे साहेब, मुख्याध्यापिका – आयु.सुनंदा गाडगे मॅडम, पर्यवेक्षक – आयु.रवींद्र कोळी सर यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन त्यांचे कौतुक व सत्कार करण्यात आला. तसेच कार्यक्रम प्रसंगी विद्यालय व ज्युनिअर कॉलेजच्या सर्व शिक्षकांना पुष्प देऊन त्यांचे इंटरनॅशनल धम्मदुत सोसायटीच्या वतीने विशेष कौतुक करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आयु. देविदास नरवाडे सर यांनी केले तर आभार प्रदर्शन सौ.माधवी किरकिरे मॅडम यांनी केले. सत्कार समारंभ व यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापिका- आयु.सुनंदा गाडगे मॅडम, पर्यवेक्षक आयु. रवींद्र कोळी सर,ज्येष्ठ शिक्षिका विद्या मॅडम,सर्व शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी विशेष मेहनत घेतली.

Total Users : 10828