ji24news

सर्वात दुर्बल घटकांच्या जीवनात बदल घडवून आणणे हाच खरा विकास, -भारताकडे शेतकऱ्यांच्या रूपाने प्रचंड कुशल मनुष्यबळ आहे -..! कृषिमंत्री.

जोहार इंडिया 24 न्यूज( प्रतिनिधी )

भारताकडे शेतकऱ्यांच्या रूपाने प्रचंड कुशल मनुष्यबळ आहे – कृषिमंत्री

             विकासाचा विचार करताना आपला  सर्वांगीण दृष्टिकोन असायला हवा असे केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी म्हटले आहे. “विकासाचा अर्थ केवळ रस्ते किंवा घरे बांधणे असा होत नाही, तर समाजातील सर्वात दुर्बल  घटकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणला पाहिजे, तरच खरा विकास होईल.

            इंडिया सस्टेनेबिलिटी कॉन्क्लेव्हमध्ये तोमर बोलत होते. केंद्रीय कृषी राज्यमंत्री कैलास चौधरी हे विशेष अतिथी होते.  तोमर म्हणाले की, आपल्या देशाची मोठी लोकसंख्या आहे, त्यामुळे सर्व लोकांना संधी उपलब्ध करून दिल्या आणि त्यांनी एकत्रितपणे  योगदान दिले तरच  विकसित भारत शक्य होईल.

            तोमर म्हणाले की, भारत हा कृषीप्रधान देश असल्यामुळे  शेतीची भूमिका महत्त्वाची आहे.  तोमर म्हणाले की, आज कृषी क्षेत्रात  ड्रोन, डिजिटल अॅग्री मिशन आणि खाजगी गुंतवणुकीला प्रोत्साहन देऊन त्याचे उन्नतीकरण केले जात आहे.  कृषी स्टार्टअप्सला प्रोत्साहन,किसान क्रेडिट कार्डचे  वितरण आणि 16 लाख कोटी रुपये अल्पावधी कर्ज यासारखी अनेक ठोस पावले उचलण्यात आली आहेत.  “कोविड-19 महामारीच्या काळातही, शेतकर्‍यांनी  अन्नसुरक्षा सुनिश्चित केली.त्याच बरोबर केंद्राने 80 कोटी गरीब लोकांना मोफत अन्नधान्य  देखील दिले,” असे तोमर म्हणाले.

ji24news
Author: ji24news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Panchang

Gold & Silver Price

Top News

Advertisement

Our Visitor

0 1 0 8 2 9
Total Users : 10829

Covid Update

जि.प.उच्च प्राथ.शाळा बांधण शाळेत अक्षरधारा फाउंडेशन ट्रस्ट मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेतील होतकरू व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक शाहित्य.

आदिवासी हक्क संघर्ष समितीच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात संपन्न…

20 वर्षांपासून पुलाची प्रतीक्षा; हिरडपाडा ग्रामस्थांचा मतदान बहिष्काराचा इशारा.लेंडी नदीवरील कायमस्वरूपी पुलासाठी दोन दशकांचा संघर्ष; ८ हजार नागरिकांचा प्रश्न ऐरणीवर

अल्ट्रा चॅम्पियन ” विशाल वळवीच्या उत्कृष्ट कामगिरीचा आदिवासी बांधवांकडून सन्मान.

अतिवृष्टीमुळे सांबरपाड्याचा एकमेव रस्त्यावर दरड कोसळून; ग्रामस्थांची मोठी गैरसोय, आमदारांना दिलेल्या निवेदनानंतरही कार्यवाही नाही

विक्रमगड आठवडे बाजाराला भरभरून प्रतिसाद मात्र शौचालयाची असुविधा – जनतेसाठी मोठा प्रश्न ?

मोखाडा तालुक्यातील १० वी-१२ वी च्या विद्यार्थ्यांना आनंददायी परीक्षेसाठी वैशाली पाटील यांचे मार्गदर्शन.

रोमहर्षक सामन्यात के के किंग 11संघाची बाजी.

दुसऱ्या फ्रीस्टाईल स्केट कार्टींगच्या नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये मोखाडा तालुक्यातील गाडर भगिनींनी पटकवाले दोन गोल्ड व एक ब्रॉन्झ मेडल्स.

पालघर: एसटीच्या लहरी कारभारामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात; परीक्षेलाही पोहोचण्यास होतोय उशीर