ji24news

टपाल खात्याकडून राष्ट्रीय पातळीवरील पत्रलेखन स्पर्धेचे आयोजन…

टपाल खात्याकडून राष्ट्रीय पातळीवरील पत्रलेखन स्पर्धेचे आयोजन…..
जोहार इंडिया 24 न्यूज( प्रतिनिधी )

, 27 जून 2022
 
टपाल खात्याकडून चालू आर्थिक वर्षासाठी असलेल्या “भारतासाठी व्हिजन 2047” संकल्पनेतून ‘ढाई अक्षर’ या राष्ट्रीय पातळीवरील पत्रलेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. 01 जुलै ते 31 ऑक्टोबर 2022 या कालावधीत पत्रलेखन अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. पत्रलेखन इंग्रजी, हिंदी आणि स्थानिक भाषेत करता येईल. स्पर्धेसाठी लिहिलेली पत्रे मुख्य पोस्टमास्तर जनरल, महाराष्ट्र सर्कल, मुंबई 400001 या पत्त्यावर पाठवावीत.
पत्रलेखन स्पर्धा दोन गटांत आयोजित करण्यात आली आहे. 18 वर्षापर्यंतचा वयोगट (आंतर्देशीय पत्र आणि लिफाफा) आणि दुसरा गट 18 वर्षांवरील (आंतर्देशीय पत्र आणि लिफाफा) असा आहे. A-4 कागदावर लिफाफा श्रेणीसाठी 1000 शब्दांपेक्षा जास्त शब्दांचा मजकूर नसावा, तसेच आंतर्देशीय पत्रासाठी 500 शब्दांपेक्षा अधिक मजकूर नसावा. केवळ हस्ताक्षरातील पत्रे स्पर्धेसाठी स्वीकारण्यात येतील. सहभागितांनी 01/01/2022 रोजी वय 18 वर्षापेक्षा कमी आणि 18 वर्षापेक्षा अधिक असे लिहून वयाचा दाखला जोडणे गरजेचे आहे. विभागीय पातळीवरील अंतिम निकाल 25 डिसेंबर 2022 पर्यंत जाहीर केले जातील.
विभागीय पातळीवरील पारितोषिक:.

पारितोषिक श्रेणी
बक्षिसाची रक्कम
प्रथम (सर्व श्रेणींतील)
रु.25,000/-
द्वितीय (सर्व श्रेणींतील)
रु.10,000/-
तृतीय (सर्व श्रेणींतील)
रु.5,000/-

 
राष्ट्रीय पातळीवरील पारितोषिक:

पारितोषिक श्रेणी
बक्षिसाची रक्कम
प्रथम (सर्व श्रेणींतील)
रु.50,000/-
द्वितीय (सर्व श्रेणींतील)
रु.25,000/-
तृतीय (सर्व श्रेणींतील)
रु.10,000/-

ji24news
Author: ji24news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Panchang

Gold & Silver Price

Top News

Advertisement

Our Visitor

0 1 0 8 2 8
Total Users : 10828

Covid Update

जि.प.उच्च प्राथ.शाळा बांधण शाळेत अक्षरधारा फाउंडेशन ट्रस्ट मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेतील होतकरू व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक शाहित्य.

आदिवासी हक्क संघर्ष समितीच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात संपन्न…

20 वर्षांपासून पुलाची प्रतीक्षा; हिरडपाडा ग्रामस्थांचा मतदान बहिष्काराचा इशारा.लेंडी नदीवरील कायमस्वरूपी पुलासाठी दोन दशकांचा संघर्ष; ८ हजार नागरिकांचा प्रश्न ऐरणीवर

अल्ट्रा चॅम्पियन ” विशाल वळवीच्या उत्कृष्ट कामगिरीचा आदिवासी बांधवांकडून सन्मान.

अतिवृष्टीमुळे सांबरपाड्याचा एकमेव रस्त्यावर दरड कोसळून; ग्रामस्थांची मोठी गैरसोय, आमदारांना दिलेल्या निवेदनानंतरही कार्यवाही नाही

विक्रमगड आठवडे बाजाराला भरभरून प्रतिसाद मात्र शौचालयाची असुविधा – जनतेसाठी मोठा प्रश्न ?

मोखाडा तालुक्यातील १० वी-१२ वी च्या विद्यार्थ्यांना आनंददायी परीक्षेसाठी वैशाली पाटील यांचे मार्गदर्शन.

रोमहर्षक सामन्यात के के किंग 11संघाची बाजी.

दुसऱ्या फ्रीस्टाईल स्केट कार्टींगच्या नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये मोखाडा तालुक्यातील गाडर भगिनींनी पटकवाले दोन गोल्ड व एक ब्रॉन्झ मेडल्स.

पालघर: एसटीच्या लहरी कारभारामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात; परीक्षेलाही पोहोचण्यास होतोय उशीर