
देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ‘हर घर तिरंगा’ उपक्रमात सहभागी होण्यासाठी जव्हार येथे घराच्या छतावर चडताना मृत्यू ..!
जोहार इंडिया न्यूज 24 (प्रतिनिधी )
देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ‘हर घर तिरंगा’ उपक्रमात सहभागी होण्यासाठी जव्हार तालुक्यातील राजेवाडी येथील लक्ष्मणभाऊ शिंदे (६५) हे त्यांच्या घरावर झेंडा लावण्यासाठी चढले होते, मात्र त्याचवेळी छपरावरील कवलं फुटल्याने ते खाली कोसळले आणि या दुर्घटनेत त्यांचा मृत्यू झाला.
लक्ष्मणभाऊ शिंदे हे महानगर टेलिफोन निगम लिमिटेड या कार्यालयातून सेवानिवृत्त झाले होते. आज(शनिवार) सकाळी आठ वाजेच्या सुमारास ते त्यांच्या घरावर तिरंगा ध्वज लावण्यासाठी चढले होते यानंतर कवलं फुटून ते खाली पडले. त्यांना जव्हार येथील उपजिल्हा रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले होते, परंतु त्यांना गंभीर स्वरूपाची दुखापत झाल्याने, नाशिक येथील सत्र रुग्णालयात हलविण्यात आले मात्र तेथेच त्यांचे निधन झाले.
Total Users : 10828