
भारती विद्यापीठ इंग्लिश मीडियम स्कूल- विक्रमगड येथे शासकीय रेखकाला परीक्षा २०२२-२३ चे आयोजन ….!
जोहार इंडिया न्यूज 24 (प्रतिनिधी )
विक्रमगड, ता. २८ (बातमीदार) ः भारती विद्यापीठ इंग्लिश मीडियम स्कूल- विक्रमगड येथे शासकीय रेखकाला परीक्षा २०२२-२३ चे आयोजन केले आहे. पालघर जिल्ह्यातील वाडा, विक्रमगड, जव्हार, मोखाडा या तालुक्यातील ८४७ विद्यार्थी या परीक्षेत सहभागी होणार आहे. ह्या मुळे विक्रमगड तालुक्यातील विद्यार्थ्यांना शासकीय रेखाकला परीक्षा बसण्यासाठी दिलासा मिळाला आहे .पूर्वी वाडा, जव्हार या ठिकाणी मुलांना जावं लागत होत, मात्र या भारतीय विद्यापीठ इंग्लिश मीडियम स्कूल या ठिकाणी परीक्षेच्या आयोजन केल्यामुळे विद्यार्थ्यांना जाणवण्याचा प्रवास आणि जास्तीत जास्त विद्यार्थी बसतील असे पालकांनी सांगितले आहे
पालघर जिल्ह्याची ओळख असलेल्या वारली पेंटिंगसारख्या अभिजात कलेची जपणूक व विकास करण्यासाठी आवश्यक एक महत्त्वाचे पाऊल म्हणून या परीक्षेचे महत्त्व आहे. राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखड्यानुसार चित्रकला विषयाचे महत्त्व अधोरेखित झाले आहे. शालेय जीवनात दिलेल्या या परीक्षांचे गुणपत्रक विद्यार्थ्यांना आपापल्या करिअरच्या वाटा शोधताना उपयुक्त ठरते आहे. एलिमेंटरी व इंटरमेजिएट परीक्षेतील गुणांमुळे विद्यार्थ्यांना इयत्ता दहावीनंतर ११ वी (तिन्ही शाखा), आयटीआय, पॉलिटेक्निक, अभियांत्रिकीसारख्या कोणत्याही अभ्यासक्रमाला प्रवेश मिळवण्याकरिता फायद्याचे ठरते.
Total Users : 10829