ji24news

भारती विद्यापीठ इंग्लिश मीडियम स्कूल- विक्रमगड येथे शासकीय रेखकाला परीक्षा २०२२-२३ चे आयोजन ….!

भारती विद्यापीठ इंग्लिश मीडियम स्कूल- विक्रमगड येथे शासकीय रेखकाला परीक्षा २०२२-२३ चे आयोजन ….!

जोहार इंडिया न्यूज 24 (प्रतिनिधी )

विक्रमगड, ता. २८ (बातमीदार) ः भारती विद्यापीठ इंग्लिश मीडियम स्कूल- विक्रमगड येथे शासकीय रेखकाला परीक्षा २०२२-२३ चे आयोजन केले आहे. पालघर जिल्ह्यातील वाडा, विक्रमगड, जव्हार, मोखाडा या तालुक्यातील ८४७ विद्यार्थी या परीक्षेत सहभागी होणार आहे. ह्या मुळे विक्रमगड तालुक्यातील  विद्यार्थ्यांना शासकीय रेखाकला परीक्षा बसण्यासाठी दिलासा मिळाला आहे .पूर्वी वाडा, जव्हार या ठिकाणी मुलांना जावं लागत होत, मात्र या भारतीय विद्यापीठ इंग्लिश मीडियम स्कूल या ठिकाणी परीक्षेच्या आयोजन केल्यामुळे विद्यार्थ्यांना जाणवण्याचा प्रवास आणि जास्तीत जास्त विद्यार्थी बसतील असे  पालकांनी  सांगितले आहे  

पालघर जिल्ह्याची ओळख असलेल्या वारली पेंटिंगसारख्या अभिजात कलेची जपणूक व विकास करण्यासाठी आवश्यक एक महत्त्वाचे पाऊल म्हणून या परीक्षेचे महत्त्व आहे. राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखड्यानुसार चित्रकला विषयाचे महत्त्व अधोरेखित झाले आहे. शालेय जीवनात दिलेल्या या परीक्षांचे गुणपत्रक विद्यार्थ्यांना आपापल्या करिअरच्या वाटा शोधताना उपयुक्त ठरते आहे. एलिमेंटरी व इंटरमेजिएट परीक्षेतील गुणांमुळे विद्यार्थ्यांना इयत्ता दहावीनंतर ११ वी (तिन्ही शाखा), आयटीआय, पॉलिटेक्निक, अभियांत्रिकीसारख्या कोणत्याही अभ्यासक्रमाला प्रवेश मिळवण्याकरिता फायद्याचे ठरते.

 

ji24news
Author: ji24news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Panchang

Gold & Silver Price

Top News

Advertisement

Our Visitor

0 1 0 8 2 9
Total Users : 10829

Covid Update

जि.प.उच्च प्राथ.शाळा बांधण शाळेत अक्षरधारा फाउंडेशन ट्रस्ट मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेतील होतकरू व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक शाहित्य.

आदिवासी हक्क संघर्ष समितीच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात संपन्न…

20 वर्षांपासून पुलाची प्रतीक्षा; हिरडपाडा ग्रामस्थांचा मतदान बहिष्काराचा इशारा.लेंडी नदीवरील कायमस्वरूपी पुलासाठी दोन दशकांचा संघर्ष; ८ हजार नागरिकांचा प्रश्न ऐरणीवर

अल्ट्रा चॅम्पियन ” विशाल वळवीच्या उत्कृष्ट कामगिरीचा आदिवासी बांधवांकडून सन्मान.

अतिवृष्टीमुळे सांबरपाड्याचा एकमेव रस्त्यावर दरड कोसळून; ग्रामस्थांची मोठी गैरसोय, आमदारांना दिलेल्या निवेदनानंतरही कार्यवाही नाही

विक्रमगड आठवडे बाजाराला भरभरून प्रतिसाद मात्र शौचालयाची असुविधा – जनतेसाठी मोठा प्रश्न ?

मोखाडा तालुक्यातील १० वी-१२ वी च्या विद्यार्थ्यांना आनंददायी परीक्षेसाठी वैशाली पाटील यांचे मार्गदर्शन.

रोमहर्षक सामन्यात के के किंग 11संघाची बाजी.

दुसऱ्या फ्रीस्टाईल स्केट कार्टींगच्या नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये मोखाडा तालुक्यातील गाडर भगिनींनी पटकवाले दोन गोल्ड व एक ब्रॉन्झ मेडल्स.

पालघर: एसटीच्या लहरी कारभारामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात; परीक्षेलाही पोहोचण्यास होतोय उशीर