
‘निपुण महाराष्ट्र कार्यक्रम अंतर्गत विक्रमगड येथील शाळेला विभाग प्रमुख ऋतुजा पाटिल यांची भेट…..
जोहार इंडिया न्यूज 24 (प्रतिनिधी )दीपक भोये विक्रमगड.
विक्रमगड येथेल जिल्हा परिषद गुरवपाडा येथे निपुण महाराष्ट्र उपक्रमांतर्गत विक्रमगड येथील माता गटांना भेटी देऊन त्यांच्याशी संवाद साधून मुलांची पायाभूत साक्षरता व संख्या ज्ञान विषयी होत असलेल्या प्रगती त्यामध्ये येणारे नवीन अनुभव यांची माहिती निपुण माता कडून घेन्यात आले. साक्षरता व संख्याज्ञान भक्कम करण्यासाठी निपुण महाराष्ट्र कार्यक्रम राबवला जात आहे. प्रथम संस्थे कडून विभागीय प्रतिनिधि यांनी माता गटांना भेटी देण्यात आले . यावेळी येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन त्या सोडवण्याचा मार्ग सुचवन्यात आले.निपुण महाराष्ट्र अंतर्गत पंचायत समिति विक्रमगड येथील तालुका नोडल अधिकारी हृषिता कोरे यांनी माताना निपुण महाराष्ट्र अंतर्गत मार्गदर्शन केले. तसेच त्यांना येणाऱ्या अडचणी समजनु घेऊन त्यांना योग्य ते माहिती देऊन आपल्या मुलांना सोप्या पद्दतिने विडियो बघुन शिकवन्यास निपुण माताना प्रोसहित केले.
यावेळी येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन त्या सोडवण्याचा मार्ग सुचविला गेला. माता गट पालकांना या अभियानाचा हेतू माता पालकांच्या भूमिका तसेच दैनंदिन व्हिडिओ संदर्भात काय नियोजन करावे व आपल्या पाल्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी सदर उपक्रमाचा कसा उपयोग करून घ्यावा यासंदर्भात निपुण मातांना मार्गदर्शन करण्यात आले. तसेच विक्रमगड येथील उत्तम कार्य माता गट बांधनी चे सुरु आहे करिता माताच्या मुलांच्या शिक्षणात उत्तम सहभाग असल्याचे माहिती या वेळी विभागीय प्रमुख ऋतुजा पाटिल, यांनी दिली या वेळी प्रशांत गवळे,तालुका नोडल अधिकारी हृषिता कोरे,गुरु तिरणकर शाळेतील शिक्षक रुन्द व मोठ्या संखेने माता उपस्थित होत्या.

Total Users : 10829