ji24news

मोखाडा तालुक्यातील बलद्याचापाडा येथील ग्रामस्थांनी श्रमदानाने बांधला वनराई बंधारा…

मोखाडा तालुक्यातील बलद्याचापाडा येथील ग्रामस्थांनी श्रमदानाने बांधला वनराई बंधारा…
जोहार इंडिया 24 न्यूज प्रतिनिधी – रामदास गाडर

     बलद्याचापाडा म्हणजे पालघर जिल्ह्याचे शेवटचे टोक होय.  बलद्याचापाड्यातील ग्रामस्थांनी कृषी विभाग - मोखाडा यांच्याकडून रिकाम्या गोणीची मागणी केली.याच रिकाम्या गोणी व मातीच्या साहाय्याने त्यांनी ' वाल ' नदीवर असलेल्या पुलाजवऴ " पाणी आडवा पाणी जिरवा " या तत्वानुसार श्रमदानातून ' वनराई बंधारा' बांधला.या बांधाऱ्याच्या माध्यमातून साठलेल्या पाण्याचा उपयोग प्रामुख्याने शेती,जनावरांना पिण्यासाठी व ग्रामस्थांना वैयक्तिक गरजांसाठी या साठलेल्या पाण्याचा उपयोग होणार आहे.  ' पाणी म्हणजे जीवन ' या उक्तीनुसार ग्रामस्थांनी पाण्याचे महत्व ओळखले तसेच सर्वांनी एकत्र येऊन सामाजिक बांधिलकी जोपासत 

‘ वनराई बंधारा ‘ बांधण्याचे महत्वपूर्ण काम केले आहे. असे असले तरी आमच्या गावाजवळ ‘ वाल ‘ नदीवर कायमस्वरूपी अनेक सिमेंटचे बंधारे बांधून बलद्याचापाडावासियांचा शेतीसाठी सिंचन व इतर जीवनापयोगी कामासाठी लागणाऱ्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवावा. अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते श्री.रामचंद्र गायकवाड यांनी ग्रामस्थांच्या वतीने प्रशासनाकडे मागणी केली आहे. या ‘ वनराई बंधारा ‘ बांधण्याकामी श्री.रामू निखडे, लक्ष्मण गायकवाड ,रमेश धनगरे,सुनिल निखडे, पांडुरंग भुजाड,सोमनाथ गायकवाड, शंकर गायकवाड, रंगनाथ बारे,प्रकाश गावित,देविदास गायकवाड, चंदर गायकवाड, कैलास सानकरे,पांडुरंग गायकवाड,नवसू पागी पांडुरंग भांगरे भगवान मौऴे कुसूम पागी,आशा सुरूम,कल्पना निखडे,सिता गायकवाड, वैशाली गायकवाड, यमुना खरपडे व इतर ग्रामस्थांनी ‘ श्रमदान ‘केले.
या स्तुत्य उपक्रमाचे कृषी विभाग – मोखाडा व सामाजिक स्तरातून कौतुक केले जात आहे.

ji24news
Author: ji24news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Panchang

Gold & Silver Price

Top News

Advertisement

Our Visitor

0 1 0 8 2 9
Total Users : 10829

Covid Update

जि.प.उच्च प्राथ.शाळा बांधण शाळेत अक्षरधारा फाउंडेशन ट्रस्ट मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेतील होतकरू व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक शाहित्य.

आदिवासी हक्क संघर्ष समितीच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात संपन्न…

20 वर्षांपासून पुलाची प्रतीक्षा; हिरडपाडा ग्रामस्थांचा मतदान बहिष्काराचा इशारा.लेंडी नदीवरील कायमस्वरूपी पुलासाठी दोन दशकांचा संघर्ष; ८ हजार नागरिकांचा प्रश्न ऐरणीवर

अल्ट्रा चॅम्पियन ” विशाल वळवीच्या उत्कृष्ट कामगिरीचा आदिवासी बांधवांकडून सन्मान.

अतिवृष्टीमुळे सांबरपाड्याचा एकमेव रस्त्यावर दरड कोसळून; ग्रामस्थांची मोठी गैरसोय, आमदारांना दिलेल्या निवेदनानंतरही कार्यवाही नाही

विक्रमगड आठवडे बाजाराला भरभरून प्रतिसाद मात्र शौचालयाची असुविधा – जनतेसाठी मोठा प्रश्न ?

मोखाडा तालुक्यातील १० वी-१२ वी च्या विद्यार्थ्यांना आनंददायी परीक्षेसाठी वैशाली पाटील यांचे मार्गदर्शन.

रोमहर्षक सामन्यात के के किंग 11संघाची बाजी.

दुसऱ्या फ्रीस्टाईल स्केट कार्टींगच्या नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये मोखाडा तालुक्यातील गाडर भगिनींनी पटकवाले दोन गोल्ड व एक ब्रॉन्झ मेडल्स.

पालघर: एसटीच्या लहरी कारभारामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात; परीक्षेलाही पोहोचण्यास होतोय उशीर