
मोखाडा तालुक्यातील बलद्याचापाडा येथील ग्रामस्थांनी श्रमदानाने बांधला वनराई बंधारा…
जोहार इंडिया 24 न्यूज प्रतिनिधी – रामदास गाडर
बलद्याचापाडा म्हणजे पालघर जिल्ह्याचे शेवटचे टोक होय. बलद्याचापाड्यातील ग्रामस्थांनी कृषी विभाग - मोखाडा यांच्याकडून रिकाम्या गोणीची मागणी केली.याच रिकाम्या गोणी व मातीच्या साहाय्याने त्यांनी ' वाल ' नदीवर असलेल्या पुलाजवऴ " पाणी आडवा पाणी जिरवा " या तत्वानुसार श्रमदानातून ' वनराई बंधारा' बांधला.या बांधाऱ्याच्या माध्यमातून साठलेल्या पाण्याचा उपयोग प्रामुख्याने शेती,जनावरांना पिण्यासाठी व ग्रामस्थांना वैयक्तिक गरजांसाठी या साठलेल्या पाण्याचा उपयोग होणार आहे. ' पाणी म्हणजे जीवन ' या उक्तीनुसार ग्रामस्थांनी पाण्याचे महत्व ओळखले तसेच सर्वांनी एकत्र येऊन सामाजिक बांधिलकी जोपासत
‘ वनराई बंधारा ‘ बांधण्याचे महत्वपूर्ण काम केले आहे. असे असले तरी आमच्या गावाजवळ ‘ वाल ‘ नदीवर कायमस्वरूपी अनेक सिमेंटचे बंधारे बांधून बलद्याचापाडावासियांचा शेतीसाठी सिंचन व इतर जीवनापयोगी कामासाठी लागणाऱ्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवावा. अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते श्री.रामचंद्र गायकवाड यांनी ग्रामस्थांच्या वतीने प्रशासनाकडे मागणी केली आहे. या ‘ वनराई बंधारा ‘ बांधण्याकामी श्री.रामू निखडे, लक्ष्मण गायकवाड ,रमेश धनगरे,सुनिल निखडे, पांडुरंग भुजाड,सोमनाथ गायकवाड, शंकर गायकवाड, रंगनाथ बारे,प्रकाश गावित,देविदास गायकवाड, चंदर गायकवाड, कैलास सानकरे,पांडुरंग गायकवाड,नवसू पागी पांडुरंग भांगरे भगवान मौऴे कुसूम पागी,आशा सुरूम,कल्पना निखडे,सिता गायकवाड, वैशाली गायकवाड, यमुना खरपडे व इतर ग्रामस्थांनी ‘ श्रमदान ‘केले.
या स्तुत्य उपक्रमाचे कृषी विभाग – मोखाडा व सामाजिक स्तरातून कौतुक केले जात आहे.

Total Users : 10829