ji24news

शेतीच्या नुकसान भरपाई साठी बेमुदत उपोषण तहसीलदार साहेबांच्या आश्वासनानंतर उपोषण स्थगिती..

शेतीच्या नुकसान भरपाई साठी बेमुदत उपोषण तहसीलदार साहेबांच्या आश्वासनानंतर उपोषण स्थगिती……

जोहार इंडिया न्यूज 24 (प्रतिनिधी ) दिपक भोये विक्रमगड.
पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील मांगरूळ (फणस पाडा) या गावातील एका कुटुंबान नुकसान भरपाई साठी तहसील कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण हत्यार उपसले आहे. सुरेश राऊत असे या शेतकऱ्याचे नाव‌ असून 27 डिसेंबर त्याच्या शेतात मोकाट गुरांनी मोठ्या प्रमाणात नुकसान केले.
फणस पाडा या गावातील शेतकरी सुरेश राऊत यांनी तीन एकर जागेत उडीद तुर हरभरा पेरला असून तो जोम धरीत असताना या गावातील काही जवळपास 25 मोकाट गुरांनी प्रवेश करून नुकसान केली.
मांगरूळ येथील शेतकरी तहसीलदार कार्यालय समोर वाडा उपोषणाला बसले होते. मोकाट गुरांनी शेतीत केलेले लागवडीचे नुकसान केल्यामुळे गुरांच्या मालकावर कार्यवाई करावी, पंचनामा करावा केलेल्या नुकसानीची मोबदला मिळवा अशी मागणी शेतकरी सुरेश राऊत यांनी केली होती. संध्याकाळी वाडा तहसीलदार कदम साहेब, नायब तहसीलदार लहांगे साहेब, यांनी उपोषणाला बसलेले शेतकऱ्यांला विश्वासात घेऊन मार्ग काढला. उपोषण सोडवण्यासाठी विनंती केल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले त्यावेळी उपस्थित स्थळी पालघर जिल्हा काँग्रेस कमिटीचे सचिव अनंता वनगा साहेब, आदिवासी मुक्ती मोर्चा व सामाजिक संघटनेचे वाडा तालुका कमिटी अध्यक्ष दयानंद हरल, वाडा शहर कमिटी संघटक प्रकाश हरल उपस्थित होते.

ji24news
Author: ji24news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Panchang

Gold & Silver Price

Top News

Advertisement

Our Visitor

0 1 0 8 2 9
Total Users : 10829

Covid Update

जि.प.उच्च प्राथ.शाळा बांधण शाळेत अक्षरधारा फाउंडेशन ट्रस्ट मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेतील होतकरू व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक शाहित्य.

आदिवासी हक्क संघर्ष समितीच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात संपन्न…

20 वर्षांपासून पुलाची प्रतीक्षा; हिरडपाडा ग्रामस्थांचा मतदान बहिष्काराचा इशारा.लेंडी नदीवरील कायमस्वरूपी पुलासाठी दोन दशकांचा संघर्ष; ८ हजार नागरिकांचा प्रश्न ऐरणीवर

अल्ट्रा चॅम्पियन ” विशाल वळवीच्या उत्कृष्ट कामगिरीचा आदिवासी बांधवांकडून सन्मान.

अतिवृष्टीमुळे सांबरपाड्याचा एकमेव रस्त्यावर दरड कोसळून; ग्रामस्थांची मोठी गैरसोय, आमदारांना दिलेल्या निवेदनानंतरही कार्यवाही नाही

विक्रमगड आठवडे बाजाराला भरभरून प्रतिसाद मात्र शौचालयाची असुविधा – जनतेसाठी मोठा प्रश्न ?

मोखाडा तालुक्यातील १० वी-१२ वी च्या विद्यार्थ्यांना आनंददायी परीक्षेसाठी वैशाली पाटील यांचे मार्गदर्शन.

रोमहर्षक सामन्यात के के किंग 11संघाची बाजी.

दुसऱ्या फ्रीस्टाईल स्केट कार्टींगच्या नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये मोखाडा तालुक्यातील गाडर भगिनींनी पटकवाले दोन गोल्ड व एक ब्रॉन्झ मेडल्स.

पालघर: एसटीच्या लहरी कारभारामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात; परीक्षेलाही पोहोचण्यास होतोय उशीर