
शेतीच्या नुकसान भरपाई साठी बेमुदत उपोषण तहसीलदार साहेबांच्या आश्वासनानंतर उपोषण स्थगिती……
जोहार इंडिया न्यूज 24 (प्रतिनिधी ) दिपक भोये विक्रमगड.
पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील मांगरूळ (फणस पाडा) या गावातील एका कुटुंबान नुकसान भरपाई साठी तहसील कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण हत्यार उपसले आहे. सुरेश राऊत असे या शेतकऱ्याचे नाव असून 27 डिसेंबर त्याच्या शेतात मोकाट गुरांनी मोठ्या प्रमाणात नुकसान केले.
फणस पाडा या गावातील शेतकरी सुरेश राऊत यांनी तीन एकर जागेत उडीद तुर हरभरा पेरला असून तो जोम धरीत असताना या गावातील काही जवळपास 25 मोकाट गुरांनी प्रवेश करून नुकसान केली.
मांगरूळ येथील शेतकरी तहसीलदार कार्यालय समोर वाडा उपोषणाला बसले होते. मोकाट गुरांनी शेतीत केलेले लागवडीचे नुकसान केल्यामुळे गुरांच्या मालकावर कार्यवाई करावी, पंचनामा करावा केलेल्या नुकसानीची मोबदला मिळवा अशी मागणी शेतकरी सुरेश राऊत यांनी केली होती. संध्याकाळी वाडा तहसीलदार कदम साहेब, नायब तहसीलदार लहांगे साहेब, यांनी उपोषणाला बसलेले शेतकऱ्यांला विश्वासात घेऊन मार्ग काढला. उपोषण सोडवण्यासाठी विनंती केल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले त्यावेळी उपस्थित स्थळी पालघर जिल्हा काँग्रेस कमिटीचे सचिव अनंता वनगा साहेब, आदिवासी मुक्ती मोर्चा व सामाजिक संघटनेचे वाडा तालुका कमिटी अध्यक्ष दयानंद हरल, वाडा शहर कमिटी संघटक प्रकाश हरल उपस्थित होते.
Total Users : 10828