ji24news

धडक सिंचनच्या मंजूर विहिरी तीन महिन्यात पुर्ण करा : मा.जिल्हाधिकारी कर्डिले…

धडक सिंचनच्या मंजूर विहिरी तीन महिन्यात पुर्ण करा : मा.जिल्हाधिकारी कर्डिले

जोहार इंडिया न्यूज 24 (प्रतिनिधी )प्रा.दिनेश राठोड (जिल्हा – वर्धा )
धडक सिंचन (Irrigation) विहीर कार्यक्रमांतर्गत जिल्ह्याला मंजूर सर्व विहिरींची कामे पावसाळ्यापुर्वी म्हणजे तीन महिन्यात पुर्ण करण्याचे निर्देश मा.जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिले.
धडक सिंचन (Irrigation) विहिरींच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हास्तरीय समितीची आढावा बैठकीत त्यांनी या सुचना केल्या. बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी तथा समितीचे सहअध्यक्ष रोहन घुगे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुरज गोहाड, रोहयो उपजिल्हाधिकारी सुप्रिया डांगे, लघु पाटबंधारेचे कार्यकारी अभियंता अजय लाडसे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. विद्या मानकर, जिप बांधकामचे कार्यकारी अभियंता पेंढे, वरिष्ठ भुवैज्ञानिक राजेश सावळे यांच्यासह सर्व गटविकास अधिकारी व विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
13 हजार धडक सिंचन (Irrigation) विहीर कार्यक्रमांतर्गत जिल्ह्याला 2 हजार विहिरी मंजूर झाल्या आहे. त्यातील 732 विहिरींची कामे सुरू झाली असून 333 विहिरी पुर्ण झाल्या आहे. उर्वरित 1 हजार 268 विहिरींची कामे तीन महिन्यात पावसाळ्यापुर्वी पुर्व करण्याचे निर्देश जलसंपदा, सार्वजनिक बांधकाम, पाणी पुरवठा, कृषी, पाटबंधारे व पंचायत विभागास जिल्हाधिकारी कर्डिले यांनी दिले. या विहीरींच्या बांधकामासाठी जिल्ह्याला 32 कोटी 50 लक्ष रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे.
विहिरी मंजूर झालेल्या सर्व लाभार्थ्यांचे व्हाट्सप ग्रुप तयार करण्यात यावे. लाभार्थ्यांशी सतत संपर्कात राहून उपविभागीय जलसंधारण अधिकारी व गटविकास अधिकार्‍यांशी समन्वय ठेऊन विहिरींचे कामे केली जावी, अशा सुचना बैठकीत करण्यात आल्या. लघु पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता लाडसे यांनी जिल्ह्याची विहिरींच्या बांधकामाची सद्यस्थिती बैठकीत सादर केली. धडक सिंचन अंतर्गत जिल्ह्यात मंजूर झालेल्या 2 हजार विहिरींपैकी वर्धा तालुका 51 विहिरी, देवळी 261, सेलू 49, आर्वी 378, आष्टी 200, कारंजा 58, हिंगणघाट 66 व समुद्रपूर 205 याप्रमाणे 1 हजार 268 शिल्लक विहिरींचे कामे युद्ध पातळीवर करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत.

ji24news
Author: ji24news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Panchang

Gold & Silver Price

Top News

Advertisement

Our Visitor

0 1 0 8 2 9
Total Users : 10829

Covid Update

जि.प.उच्च प्राथ.शाळा बांधण शाळेत अक्षरधारा फाउंडेशन ट्रस्ट मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेतील होतकरू व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक शाहित्य.

आदिवासी हक्क संघर्ष समितीच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात संपन्न…

20 वर्षांपासून पुलाची प्रतीक्षा; हिरडपाडा ग्रामस्थांचा मतदान बहिष्काराचा इशारा.लेंडी नदीवरील कायमस्वरूपी पुलासाठी दोन दशकांचा संघर्ष; ८ हजार नागरिकांचा प्रश्न ऐरणीवर

अल्ट्रा चॅम्पियन ” विशाल वळवीच्या उत्कृष्ट कामगिरीचा आदिवासी बांधवांकडून सन्मान.

अतिवृष्टीमुळे सांबरपाड्याचा एकमेव रस्त्यावर दरड कोसळून; ग्रामस्थांची मोठी गैरसोय, आमदारांना दिलेल्या निवेदनानंतरही कार्यवाही नाही

विक्रमगड आठवडे बाजाराला भरभरून प्रतिसाद मात्र शौचालयाची असुविधा – जनतेसाठी मोठा प्रश्न ?

मोखाडा तालुक्यातील १० वी-१२ वी च्या विद्यार्थ्यांना आनंददायी परीक्षेसाठी वैशाली पाटील यांचे मार्गदर्शन.

रोमहर्षक सामन्यात के के किंग 11संघाची बाजी.

दुसऱ्या फ्रीस्टाईल स्केट कार्टींगच्या नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये मोखाडा तालुक्यातील गाडर भगिनींनी पटकवाले दोन गोल्ड व एक ब्रॉन्झ मेडल्स.

पालघर: एसटीच्या लहरी कारभारामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात; परीक्षेलाही पोहोचण्यास होतोय उशीर