
धडक सिंचनच्या मंजूर विहिरी तीन महिन्यात पुर्ण करा : मा.जिल्हाधिकारी कर्डिले
जोहार इंडिया न्यूज 24 (प्रतिनिधी )प्रा.दिनेश राठोड (जिल्हा – वर्धा )
धडक सिंचन (Irrigation) विहीर कार्यक्रमांतर्गत जिल्ह्याला मंजूर सर्व विहिरींची कामे पावसाळ्यापुर्वी म्हणजे तीन महिन्यात पुर्ण करण्याचे निर्देश मा.जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिले.
धडक सिंचन (Irrigation) विहिरींच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हास्तरीय समितीची आढावा बैठकीत त्यांनी या सुचना केल्या. बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी तथा समितीचे सहअध्यक्ष रोहन घुगे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुरज गोहाड, रोहयो उपजिल्हाधिकारी सुप्रिया डांगे, लघु पाटबंधारेचे कार्यकारी अभियंता अजय लाडसे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. विद्या मानकर, जिप बांधकामचे कार्यकारी अभियंता पेंढे, वरिष्ठ भुवैज्ञानिक राजेश सावळे यांच्यासह सर्व गटविकास अधिकारी व विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
13 हजार धडक सिंचन (Irrigation) विहीर कार्यक्रमांतर्गत जिल्ह्याला 2 हजार विहिरी मंजूर झाल्या आहे. त्यातील 732 विहिरींची कामे सुरू झाली असून 333 विहिरी पुर्ण झाल्या आहे. उर्वरित 1 हजार 268 विहिरींची कामे तीन महिन्यात पावसाळ्यापुर्वी पुर्व करण्याचे निर्देश जलसंपदा, सार्वजनिक बांधकाम, पाणी पुरवठा, कृषी, पाटबंधारे व पंचायत विभागास जिल्हाधिकारी कर्डिले यांनी दिले. या विहीरींच्या बांधकामासाठी जिल्ह्याला 32 कोटी 50 लक्ष रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे.
विहिरी मंजूर झालेल्या सर्व लाभार्थ्यांचे व्हाट्सप ग्रुप तयार करण्यात यावे. लाभार्थ्यांशी सतत संपर्कात राहून उपविभागीय जलसंधारण अधिकारी व गटविकास अधिकार्यांशी समन्वय ठेऊन विहिरींचे कामे केली जावी, अशा सुचना बैठकीत करण्यात आल्या. लघु पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता लाडसे यांनी जिल्ह्याची विहिरींच्या बांधकामाची सद्यस्थिती बैठकीत सादर केली. धडक सिंचन अंतर्गत जिल्ह्यात मंजूर झालेल्या 2 हजार विहिरींपैकी वर्धा तालुका 51 विहिरी, देवळी 261, सेलू 49, आर्वी 378, आष्टी 200, कारंजा 58, हिंगणघाट 66 व समुद्रपूर 205 याप्रमाणे 1 हजार 268 शिल्लक विहिरींचे कामे युद्ध पातळीवर करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत.
Total Users : 10829