
तीन महिला अधिकार्यांना राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर…
प्रा.दिनेश राठोड
Ji 24 news जिल्हा प्रतिनिधी – वर्धा…
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजनेअंतर्गत अपूर्ण कामे पूर्ण करणार्या वर्धा जिल्ह्यातील तीन महिला अधिकार्यांचा मुंबईत 3 रोजी सन्मान करण्यात येणार आहे.
संपूर्ण राज्यातून रोहयो अंतर्गत येणार्या कामाची अपूर्ण कामे पूर्ण करण्याची टक्केवारी सर्वात जास्त असल्याने जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ज्ञानदा फणसे, रोहयो उपजिल्हाधिकारी सुप्रिया डांगे व जिल्हा एमआयएस समन्वयक यशस्वी काटोले यांना राज्य शासनाचा उत्कृष्ट अधिकारी म्हणून पुरस्कार जाहीर झाला आहे. रोहयोअंतर्गत संपूर्ण राज्यात 32 लाख 50 हजार 289 कामे घेण्यात आली आहे. त्यापैकी 24 लाख 29 हजार 316 कामे पूर्ण करण्यात आली असून अपूर्ण कामाची संख्या 8 लाख 20 हजार 973 आहे. अपूर्ण कामाची संख्या सर्वात कमी असलेले वर्धा जिल्हा 11 टक्के, भंडारा व गडचिरोली जिल्हा 16 टक्के असून कामे प्रगतीपथावर आहेत. सर्वात जास्त कामे पूर्णची टक्केवारी वर्धा जिल्ह्याची 89.32 टक्के आहे.
Total Users : 10829