ji24news

तीन महिला अधिकार्‍यांना राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर…

तीन महिला अधिकार्‍यांना राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर…

प्रा.दिनेश राठोड
Ji 24 news जिल्हा प्रतिनिधी – वर्धा…

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजनेअंतर्गत अपूर्ण कामे पूर्ण करणार्‍या वर्धा जिल्ह्यातील तीन महिला अधिकार्‍यांचा मुंबईत 3 रोजी सन्मान करण्यात येणार आहे.
संपूर्ण राज्यातून रोहयो अंतर्गत येणार्‍या कामाची अपूर्ण कामे पूर्ण करण्याची टक्केवारी सर्वात जास्त असल्याने जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ज्ञानदा फणसे, रोहयो उपजिल्हाधिकारी सुप्रिया डांगे व जिल्हा एमआयएस समन्वयक यशस्वी काटोले यांना राज्य शासनाचा उत्कृष्ट अधिकारी म्हणून पुरस्कार जाहीर झाला आहे. रोहयोअंतर्गत संपूर्ण राज्यात 32 लाख 50 हजार 289 कामे घेण्यात आली आहे. त्यापैकी 24 लाख 29 हजार 316 कामे पूर्ण करण्यात आली असून अपूर्ण कामाची संख्या 8 लाख 20 हजार 973 आहे. अपूर्ण कामाची संख्या सर्वात कमी असलेले वर्धा जिल्हा 11 टक्के, भंडारा व गडचिरोली जिल्हा 16 टक्के असून कामे प्रगतीपथावर आहेत. सर्वात जास्त कामे पूर्णची टक्केवारी वर्धा जिल्ह्याची 89.32 टक्के आहे.

ji24news
Author: ji24news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Panchang

Gold & Silver Price

Top News

Advertisement

Our Visitor

0 1 0 8 2 9
Total Users : 10829

Covid Update

जि.प.उच्च प्राथ.शाळा बांधण शाळेत अक्षरधारा फाउंडेशन ट्रस्ट मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेतील होतकरू व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक शाहित्य.

आदिवासी हक्क संघर्ष समितीच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात संपन्न…

20 वर्षांपासून पुलाची प्रतीक्षा; हिरडपाडा ग्रामस्थांचा मतदान बहिष्काराचा इशारा.लेंडी नदीवरील कायमस्वरूपी पुलासाठी दोन दशकांचा संघर्ष; ८ हजार नागरिकांचा प्रश्न ऐरणीवर

अल्ट्रा चॅम्पियन ” विशाल वळवीच्या उत्कृष्ट कामगिरीचा आदिवासी बांधवांकडून सन्मान.

अतिवृष्टीमुळे सांबरपाड्याचा एकमेव रस्त्यावर दरड कोसळून; ग्रामस्थांची मोठी गैरसोय, आमदारांना दिलेल्या निवेदनानंतरही कार्यवाही नाही

विक्रमगड आठवडे बाजाराला भरभरून प्रतिसाद मात्र शौचालयाची असुविधा – जनतेसाठी मोठा प्रश्न ?

मोखाडा तालुक्यातील १० वी-१२ वी च्या विद्यार्थ्यांना आनंददायी परीक्षेसाठी वैशाली पाटील यांचे मार्गदर्शन.

रोमहर्षक सामन्यात के के किंग 11संघाची बाजी.

दुसऱ्या फ्रीस्टाईल स्केट कार्टींगच्या नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये मोखाडा तालुक्यातील गाडर भगिनींनी पटकवाले दोन गोल्ड व एक ब्रॉन्झ मेडल्स.

पालघर: एसटीच्या लहरी कारभारामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात; परीक्षेलाही पोहोचण्यास होतोय उशीर