
अखेर देहर्जे प्रकल्पग्रस्तांना मोबदला मिळण्याचा मार्ग मोकळा
पालकमंत्री मा. गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत झाला निर्णय
खासदार डॉक्टर हेमंत सवरा यांचा विशेष बैठकीचा आग्रह फलदायी
पालघर प्रतिनिधी
विक्रमगड तालुक्यातील देहर्जे प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रलंबित मोबदल्याबाबत आज मंत्रालयात राज्याचे वनमंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री मा. श्री. गणेशजी नाईक यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली.
खासदार डॉक्टर हेमंत सवरा, आमदार राजेंद्र गावित, जिल्हाधिकारी – डॉ.इंदुराणी जाखड ,जलसंपदा ,महसूल , मदत व पुनर्वसन विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
या बैठकीचा आग्रह व पुढाकार खासदार डॉ. हेमंत विष्णु सवरा यांनी घेतला होता. प्रकल्पग्रस्तांच्या न्याय्य मागण्यांसाठी त्यांनी शासनस्तरावर सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यामुळेच हा फलदायी निर्णय झाला.
-
- २०१८ पासून जमीन संपादित केल्या होत्या खुडेद, साखरे व जांभा या गावांमधील शेतकऱ्यांना पिकांची नुकसान भरपाई म्हणून केवळ ₹१५,००० देण्यात आले होते. मात्र २०१८ नंतर या तिन्ही तसेच लगतच्या गावांमध्ये कोणताही खरेदी-विक्री व्यवहार न झाल्याने आणि रेडी रेकनर दर अत्यल्प असल्याने मोबदल्याचा दर ठरविण्यात अडचणी येत होत्या. त्यामुळे मलवाडा गावाचे खरेदी-विक्री दर ग्राह्य धरण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला होता, परंतु त्यावर धोरणात्मक निर्णय आवश्यक होता. त्या अनुषंगाने आजच्या बैठकीत महत्त्वपूर्ण धोरणात्मक निर्णय घेण्यात आला. मलवाडा गावाचा हेक्टरी ₹ २५ लक्ष दर देहेर्जे प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना लागू करण्याच्या या निर्णयामुळे विक्रमगड तालुक्यातील देहर्जे प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या दीर्घकाळ प्रलंबित मोबदल्याचा प्रश्न मार्गी लागण्याची अपेक्षा आहे. या निर्णयामूळे बाधित शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
Total Users : 10829