ji24news

अखेर देहर्जे प्रकल्पग्रस्तांना मोबदला मिळण्याचा मार्ग मोकळा

अखेर देहर्जे प्रकल्पग्रस्तांना मोबदला मिळण्याचा मार्ग मोकळा

 

पालकमंत्री मा. गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत झाला निर्णय 

 

खासदार डॉक्टर हेमंत सवरा यांचा विशेष बैठकीचा आग्रह फलदायी

 

पालघर प्रतिनिधी

 

विक्रमगड तालुक्यातील देहर्जे प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रलंबित मोबदल्याबाबत आज मंत्रालयात राज्याचे वनमंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री मा. श्री. गणेशजी नाईक यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली. 

खासदार डॉक्टर हेमंत सवरा, आमदार राजेंद्र गावित, जिल्हाधिकारी – डॉ.इंदुराणी जाखड ,जलसंपदा ,महसूल , मदत व पुनर्वसन विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

            या बैठकीचा आग्रह व पुढाकार खासदार डॉ. हेमंत विष्णु सवरा यांनी घेतला होता. प्रकल्पग्रस्तांच्या न्याय्य मागण्यांसाठी त्यांनी शासनस्तरावर सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यामुळेच हा फलदायी निर्णय झाला.

    1.            २०१८ पासून जमीन संपादित केल्या होत्या खुडेद, साखरे व जांभा या गावांमधील शेतकऱ्यांना पिकांची नुकसान भरपाई म्हणून केवळ ₹१५,००० देण्यात आले होते. मात्र २०१८ नंतर या तिन्ही तसेच लगतच्या गावांमध्ये कोणताही खरेदी-विक्री व्यवहार न झाल्याने आणि रेडी रेकनर दर अत्यल्प असल्याने मोबदल्याचा दर ठरविण्यात अडचणी येत होत्या. त्यामुळे मलवाडा गावाचे खरेदी-विक्री दर ग्राह्य धरण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला होता, परंतु त्यावर धोरणात्मक निर्णय आवश्यक होता. त्या अनुषंगाने आजच्या बैठकीत महत्त्वपूर्ण धोरणात्मक निर्णय घेण्यात आला. मलवाडा गावाचा हेक्टरी ₹ २५ लक्ष दर देहेर्जे प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना लागू करण्याच्या या निर्णयामुळे विक्रमगड तालुक्यातील देहर्जे प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या दीर्घकाळ प्रलंबित मोबदल्याचा प्रश्न मार्गी लागण्याची अपेक्षा आहे. या निर्णयामूळे बाधित शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
ji24news
Author: ji24news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Panchang

Gold & Silver Price

Top News

Advertisement

Our Visitor

0 1 0 8 2 9
Total Users : 10829

Covid Update

जि.प.उच्च प्राथ.शाळा बांधण शाळेत अक्षरधारा फाउंडेशन ट्रस्ट मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेतील होतकरू व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक शाहित्य.

आदिवासी हक्क संघर्ष समितीच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात संपन्न…

20 वर्षांपासून पुलाची प्रतीक्षा; हिरडपाडा ग्रामस्थांचा मतदान बहिष्काराचा इशारा.लेंडी नदीवरील कायमस्वरूपी पुलासाठी दोन दशकांचा संघर्ष; ८ हजार नागरिकांचा प्रश्न ऐरणीवर

अल्ट्रा चॅम्पियन ” विशाल वळवीच्या उत्कृष्ट कामगिरीचा आदिवासी बांधवांकडून सन्मान.

अतिवृष्टीमुळे सांबरपाड्याचा एकमेव रस्त्यावर दरड कोसळून; ग्रामस्थांची मोठी गैरसोय, आमदारांना दिलेल्या निवेदनानंतरही कार्यवाही नाही

विक्रमगड आठवडे बाजाराला भरभरून प्रतिसाद मात्र शौचालयाची असुविधा – जनतेसाठी मोठा प्रश्न ?

मोखाडा तालुक्यातील १० वी-१२ वी च्या विद्यार्थ्यांना आनंददायी परीक्षेसाठी वैशाली पाटील यांचे मार्गदर्शन.

रोमहर्षक सामन्यात के के किंग 11संघाची बाजी.

दुसऱ्या फ्रीस्टाईल स्केट कार्टींगच्या नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये मोखाडा तालुक्यातील गाडर भगिनींनी पटकवाले दोन गोल्ड व एक ब्रॉन्झ मेडल्स.

पालघर: एसटीच्या लहरी कारभारामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात; परीक्षेलाही पोहोचण्यास होतोय उशीर