ji24news

मुंबई हाय क्षेत्रात पडलेल्या ओएनजीसीच्या हेलिकॉप्टरमधून त्यातील कर्मचाऱ्यांची भारतीय तटरक्षक दलाने केली सुखरूप सुटका….

जोहार इंडिया 24 न्यूज( प्रतिनिधी )

मुंबई हाय क्षेत्रात पडलेल्या ओएनजीसीच्या हेलिकॉप्टरमधून त्यातील कर्मचाऱ्यांची भारतीय तटरक्षक दलाने केली सुखरूप सुटका.

नवी दिल्‍ली, 28 जून 2022.

भारतीय तटरक्षक दलाने 28 जून 2022 रोजी मुंबई हाय  भागात ओएनजीसीसाठी कार्यरत हेलिकॉप्टरमधून कर्मचाऱ्यांची सुखरूप सुटका केली. आयसीजी अंतर्गत सागरी मदत समन्वय केंद्राला -MRCC (मुंबई) ला एक संकटात सापडल्याचा एक  संदेश मिळाला आणि तो  मुंबई हायमध्ये ओएनजीसीसाठी नियुक्त केलेल्या पवन हंस हेलिकॉप्टरबाबत होता याचा शोध लागला. या हेलिकॉप्टरमध्ये 2 वैमानिक आणि 7 कर्मचारी होते आणि तेलाच्या प्लॅटफॉर्मवर आपत्कालीन लँडिंगचा प्रयत्न करत असताना ते समुद्रात कोसळले.

सागरी मदत समन्वय केंद्राने MRCC (मुंबई) तातडीने शोध आणि बचावासाठी सर्व संबंधितांना सतर्क केले. भारतीय नौदलाकडे तातडीची मदत मागण्यात  आली आणि त्यानुसार नेव्हल सीकिंग आणि एएलएच तैनात करण्यात आले. आव्हानात्मक हवामानात, ओएनजीसी  जहाज OSV मालवीय-16 ला शोधून त्यातील चौघांची  सुटका केली तर ओएनजीसी  रिग सागर किरण यांच्या लाइफ बोटद्वारे 1  व्यक्तीची सुटका करण्यात आली. त्याचप्रमाणे, नेव्हल सीकिंग आणि ALH ने गंभीर अवस्थेत असलेल्या चौघांना बाहेर काढले आणि पुढील वैद्यकीय उपचारांसाठी  त्यांना जुहू हवाई तळावर नेण्यात आले. सर्व संबंधितांच्या समन्वित प्रयत्नांद्वारे 2 तासात बचाव कार्य पूर्ण करण्यात आले.

ji24news
Author: ji24news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Panchang

Gold & Silver Price

Top News

Advertisement

Our Visitor

0 1 0 8 2 8
Total Users : 10828

Covid Update

जि.प.उच्च प्राथ.शाळा बांधण शाळेत अक्षरधारा फाउंडेशन ट्रस्ट मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेतील होतकरू व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक शाहित्य.

आदिवासी हक्क संघर्ष समितीच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात संपन्न…

20 वर्षांपासून पुलाची प्रतीक्षा; हिरडपाडा ग्रामस्थांचा मतदान बहिष्काराचा इशारा.लेंडी नदीवरील कायमस्वरूपी पुलासाठी दोन दशकांचा संघर्ष; ८ हजार नागरिकांचा प्रश्न ऐरणीवर

अल्ट्रा चॅम्पियन ” विशाल वळवीच्या उत्कृष्ट कामगिरीचा आदिवासी बांधवांकडून सन्मान.

अतिवृष्टीमुळे सांबरपाड्याचा एकमेव रस्त्यावर दरड कोसळून; ग्रामस्थांची मोठी गैरसोय, आमदारांना दिलेल्या निवेदनानंतरही कार्यवाही नाही

विक्रमगड आठवडे बाजाराला भरभरून प्रतिसाद मात्र शौचालयाची असुविधा – जनतेसाठी मोठा प्रश्न ?

मोखाडा तालुक्यातील १० वी-१२ वी च्या विद्यार्थ्यांना आनंददायी परीक्षेसाठी वैशाली पाटील यांचे मार्गदर्शन.

रोमहर्षक सामन्यात के के किंग 11संघाची बाजी.

दुसऱ्या फ्रीस्टाईल स्केट कार्टींगच्या नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये मोखाडा तालुक्यातील गाडर भगिनींनी पटकवाले दोन गोल्ड व एक ब्रॉन्झ मेडल्स.

पालघर: एसटीच्या लहरी कारभारामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात; परीक्षेलाही पोहोचण्यास होतोय उशीर