
जोहार इंडिया 24 न्यूज( प्रतिनिधी )
भारतीय हवामान विभागाने गुरुवारी झालेल्या पावसानंतर पुढील 24 तासांसाठी मुंबई तसंच आसपासच्या जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. तसंच हवामान खात्याने पुढील तीन दिवसांत मुंबई, ठाणे, पालघर या जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी केला आहे.
पुढील तीन दिवस मुंबई, ठाणे, पालघर, कोल्हापूर या जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. गुरुवारी दिवसभर झालेल्या मुसळधार पावसाने मुंबईसह अन्य जिल्ह्यांत जनजीवन विस्कळीत झालं.
दिनांक 1 जुलै ,2022
वेळ : दुपारी 4 वाजता
पुढील 3-4 तास पालघर जिल्ह्यात काही ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडण्याचा इशारा देण्यात आला आहे *
आज सकाळी 8:30 ते उद्या सकाळी 8:30 पर्यंत संपूर्ण पालघर जिल्ह्यात सरासरी 110 मिमी पाऊस पडण्याचा अंदाज आहे.
सर्व शेतकरी व नागरिकांनी घराबाहेर पडताना सतर्कता बाळगावी.
जिल्हा कृषि हवामान केंद्र, ग्रामीण कृषि मौसम सेवा, कृषि विज्ञान केंद्र, कोसबाड हिल, पालघर.

Total Users : 10828