ji24news

सुंदरम मल्टीपॅप लिमिटेड या कंपनीचे संचालक, सुंदरम सेंट्रल स्कूलचे अध्यक्ष, सामाजिक कार्यकर्ते रायचंद शहा यांचे अल्पशा आजाराने निधन .

जोहार इंडिया 24 न्यूज( प्रतिनिधी )

पालघर जिल्हा .

शैक्षणिक साहित्य निर्मितीमध्ये अग्रगण्य असणाऱ्या सुंदरम मल्टीपॅप लिमिटेड या कंपनीचे संचालक, सुंदरम सेंट्रल स्कूलचे अध्यक्ष, सामाजिक कार्यकर्ते रायचंद शहा (६०) यांचे आज (२ जुलै) रोजी अल्पशा आजाराने निधन झाले.

त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली आणि एक मुलगा असा परिवार आहे.
१९८७मध्ये पालघर येथे सुंदरम इंडस्ट्रीज या नावाने वह्या तयार करण्याचा कारखाना त्यांच्या कुटुंबांनी सुरू केला. कालांतराने या व्यवसायात वाढ होऊन त्याचे रूपांतर सुंदरम मल्टिपॅप लिमिटेड मध्ये झाले.
           १९९० च्या दशकामध्ये बिडको भागातील मूलभूत सुविधां मिळविण्यासाठी तसेच कारखानदारांच्या भेडसावणाऱ्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या पालघर मॅन्युफॅक्चर असोसिएशनचे ते संस्थापक सदस्य व विद्यमान अध्यक्ष होते.पालघर भागातील विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे शिक्षण मिळावे म्हणून सीबीएससी बोर्डाची सुंदरम सेंट्रल स्कूल नावाने सुरू झालेल्या शाळेच्या संस्थापक सदस्य आणि मागील आठ वर्ष अध्यक्ष पद ते भूषवत होते.
         पालघर देवखोप येथील कलापुरनम जीवदया धाम या गोशाळेचे ते संस्थापक सदस्य आणि विद्यमान पदाधिकारी होते. ढवळे रुग्णालयातील कम्युनिटी केअर कमिटी चे स्थापनेपासून ते अध्यक्ष होते. पालघर येथील कर्णबधिर शाळा चालवणाऱ्या प्रतीक सेवा मंडळचे ते मागील अनेक वर्ष खजिनदार होते. या शासकीय मान्यता मिळवून देण्यात रायचंद शहा यांचे योगदान होते. पालघर परिसरातील अनेक सामाजिक संस्थांशी त्यांचा संबंध होता. अनेक सामाजिक उपक्रमात त्यांनी अनेकदा योगदान दिले होते.

ji24news
Author: ji24news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Panchang

Gold & Silver Price

Top News

Advertisement

Our Visitor

0 1 0 8 2 9
Total Users : 10829

Covid Update

जि.प.उच्च प्राथ.शाळा बांधण शाळेत अक्षरधारा फाउंडेशन ट्रस्ट मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेतील होतकरू व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक शाहित्य.

आदिवासी हक्क संघर्ष समितीच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात संपन्न…

20 वर्षांपासून पुलाची प्रतीक्षा; हिरडपाडा ग्रामस्थांचा मतदान बहिष्काराचा इशारा.लेंडी नदीवरील कायमस्वरूपी पुलासाठी दोन दशकांचा संघर्ष; ८ हजार नागरिकांचा प्रश्न ऐरणीवर

अल्ट्रा चॅम्पियन ” विशाल वळवीच्या उत्कृष्ट कामगिरीचा आदिवासी बांधवांकडून सन्मान.

अतिवृष्टीमुळे सांबरपाड्याचा एकमेव रस्त्यावर दरड कोसळून; ग्रामस्थांची मोठी गैरसोय, आमदारांना दिलेल्या निवेदनानंतरही कार्यवाही नाही

विक्रमगड आठवडे बाजाराला भरभरून प्रतिसाद मात्र शौचालयाची असुविधा – जनतेसाठी मोठा प्रश्न ?

मोखाडा तालुक्यातील १० वी-१२ वी च्या विद्यार्थ्यांना आनंददायी परीक्षेसाठी वैशाली पाटील यांचे मार्गदर्शन.

रोमहर्षक सामन्यात के के किंग 11संघाची बाजी.

दुसऱ्या फ्रीस्टाईल स्केट कार्टींगच्या नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये मोखाडा तालुक्यातील गाडर भगिनींनी पटकवाले दोन गोल्ड व एक ब्रॉन्झ मेडल्स.

पालघर: एसटीच्या लहरी कारभारामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात; परीक्षेलाही पोहोचण्यास होतोय उशीर