
कर्मचाऱ्यांची विनाअनुदानित वरून अनुदानित शाळेवर बदली केल्यास पूर्ण वेतन देण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश.
जोहार इंडिया 24 न्यूज( प्रतिनिधी ).
कोकण . खाजगी शाळांतील कर्मचाऱ्यांची विनाअनुदानित शाळा किंवा तुकडी मधून शंभर टक्के अनुदानित किंवा विनाअनुदानित किंवा अंशतः अनुदानित तुकडी किंवा शाळेवर बदली केल्यास त्या अनुदानानुसारच वेतन देण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत.
याबाबतच्या वृत्तानुसार राज्यातील अनेक शिक्षण संस्थांमध्ये अनुदानित, विनाअनुदानित,अंशतः अनुदानित आणि अनुदानित स्वरूपातील शाळा व शाळा मध्ये तुकड्या कार्यरत आहेत.
अशा स्थितीमध्ये विनाअनुदानित कडून अंशतः अनुदानित किंवा अनुदानित तुकडीवर वा शाळेत कर्मचारी बदली केल्यास माध्यमिक शिक्षणाधिकारी यांचेकडून त्यांना टप्पा स्वरूपात वेतन अदा करण्याचे आदेश दिले जात होते.
सदरची बाब संबंधित कर्मचाऱ्याला आर्थिक लाभांपासून वंचित ठेवणारी व कायद्यातील तरतुदीचा भंग करणारी असल्याने याबाबत मा उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले.
याबाबत न्यायालयाने अशा प्रकरणी विनाअनुदानित तुकडी किंवा शाळेतील कर्मचाऱ्यांची बदली अंशतः अनुदानित किंवा शंभर टक्के अनुदानित तुकडी किंवा शाळेत केली तर त्या कर्मचाऱ्यांना संबंधित तुकडीला वा शाळेला देय असणाऱ्या
वेतन अनुदानाच्या टक्केवारीनुसार वेतन अदा करावे अशा प्रकारचे आदेश दिले होते.
मात्र उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचे माध्यमिक शिक्षण विभागाकडून पालन केले जात नव्हते.
अशाच एका प्रकरणी सादर केलेल्या याचिकेवर न्यायालयाने विनाअनुदानित तुकडी वा शाळेतील कर्मचाऱ्यांना अंशतः वा अनुदानित तुकडीवर वा शाळेत बदली केल्यास त्याठिकाणी मंजूर अनुदानानुसारच वेतन अदा करण्याचा आदेश देण्यात आला आहे. यामुळे शिक्षकांना देय वेतन प्राप्त होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
या प्रकरणी कोकण विभाग शिक्षक मतदार संघातील उमेदवार व कोकण विभागीय अध्यक्ष धनाजी पाटील यांनी लक्ष घालून शिक्षकांना न्याय मिळण्यासाठी यथोचित मार्गदर्शन केले होते.
दरम्यान उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाबद्दल शिक्षकांकडून आनंद व्यक्त होत आहे. या निर्णयामुळे विनाअनुदानित शाळांतून 100 टक्के अनुदानित शाळेत कर्मचाऱ्यांना बदली झाल्यास त्या कर्मचाऱ्यांना पूर्ण वेतन मिळण्याच्या मागणीवर न्यायालयाचे निर्णयामुळे शिक्कामोर्तब झाले आहे.
कोकण विभाग शिक्षक मतदार संघातील उमेदवार व कोकण विभागीय अध्यक्ष धनाजी पाटील.
Total Users : 10829