ji24news

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण पालघर तर्फे जनहितार्थ, नागरिकांनी सतर्कता बाळगावी व सुरक्षित राहावे..!

भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार पालघर जिल्ह्याच्या काही भागात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता वर्तविली आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्कता बाळगावी व सुरक्षित राहावे, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने केले आहे…

जोहार इंडिया 24 न्यूज( प्रतिनिधी )

   पालघर जिल्हा :- दिनांक 11 ते 14 जुलै 2022 या कालावधीमध्ये जिल्ह्यात काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.रेड अलर्ट जारी केला आहे. या कालावधीमध्ये काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. तरी जिल्ह्यातील ग्रामस्थांनी खालीलप्रमाणे काळजी घ्यावी.

1. पुलावरून संरक्षक दगडावरून पाणी वाहत असल्यास प्रवास टाळावा. धाडसाने वाहन पाण्यामध्ये घालू नये.

2. अतिवृष्टीमुळे वाहतूक विस्कळीत झाल्यास, सर्वांनी वाहतुकीचे नियम पाळावेत. अनावश्यक ओव्हर टेक करून वाहनांच्या ३-३ रांगा करू नये. प्रवासात आवश्यक खबरदारी घ्यावी.

3.वाहतूक पोलिसांना सहकार्य करावे.

4. अतिवृष्टीमध्ये रस्त्यावर दरड कोसळण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने प्रवास करताना काळजी घ्यावी.

5. आपले घर सुरक्षित असल्यास व अतिवृष्टीमुळे घरांमध्ये पाणी भरणार नाही याची खात्री असल्यास घरातच सुरक्षित राहावे.

6. या कालावधीमध्ये आवश्यकता नसेल, तर घराच्या बाहेर पडू नये.

७. घरामध्ये पाणी घुसून पाण्याची पातळी वाढत असल्यास तात्काळ घर सोडून सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा.

८.आपले घर मोडकळीस आलेल्या स्थितीमध्ये असेल किंवा कच्च्या स्वरूपाचे असेल तर तात्काळ उंचावरील ठिकाणी किंवा सुरक्षितस्थळी आवश्यक क साधनसामुग्री सोबत घेऊन स्थलांतरित व्हावे.

९. घराच्या अवतीभोवती पाऊस व वादळामुळे कोणत्या वस्तु विजेचे खांब किंवा तारा, झाडे इत्यादी पडण्याची शक्यता असल्यास अशा वस्तूपासून लांब राहावे.

१०. आपले पशुधन व अन्य पाळीव प्राणी यांना अगोदरच सुरक्षित स्थळी हलवावे.

११. आपले जवळ दैनंदिन लागणारी औषधे, केरोसीन वर चालणारे बंदिस्त दिवे बॅटरी, गॅसबत्ती, काडीपेटी या वस्तू ठेवाव्यात.

१२. मोबाईल फोन बॅटरी चार्ज करून ठेवावेत.

१३. अतिवृष्टीच्या बाबत मिळणारे इशारे समजण्यासाठी जवळ रेडिओ बाळगावा.

१४. रेडिओ साठी काही जास्त वॅटच्या बॅटरीज जवळ ठेवाव्यात.

१५. अतिवृष्टीचा फटका टाळण्यासाठी दरडप्रवण भागातील तसेच नदी, नाले किनारी राहणाऱ्या सखल भागातील लोकांनी सावधगिरी बाळगावी व अतिवृष्टीमुळे पाणी पातळी वाढत असल्यास तात्काळ सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा.

१६. ग्राम कृती दलांनी सतर्क राहून वेळोवेळी तहसील कार्यालयास माहिती द्यावी.

१७. मासेमारीसाठी व पोहायला नदी, तलाव, नाल्यात जाऊ नये. धबधब्याच्या ठिकाणी जाऊ नये.

१८. विजा चमकत असताना झाडाखाली थांबू नये. मोबाईलचा वापर करू नये.

१९. आपला जीव आपल्या मिळकतीपेक्षा महत्त्वाचा असल्याने प्रथम जीवितास प्राधान्य द्यावे.

२०. इमारतीच्या तळमजल्यात विजेच्या मीटरपर्यंत पाणी पोहचणार नाही याची काळजी घ्यावी आणि तात्काळ महावितरणच्या अधिकाऱ्यास कळवावे.

            मदत आवश्यक असल्यास आपल्या ग्रामपंचायत, तलाठी, ग्रामसेवक, तहसील कार्यालयाशी संपर्क साधावा..
1) पालघर तालुका नियंत्रण कक्ष :- ०२५२५ २५४९३०
2) डहाणू तालुका नियंत्रण कक्ष :- ९६०७७४४२५८
3) तलासरी तालुका नियंत्रण कक्ष :- ९६३७६९२१०२
4) वसई तालुका नियंत्रण कक्ष :- ७०५७६६२४८९
5) विक्रमगड तालुका नियंत्रण कक्ष :- ८८०६८९८५६५
6) वाडा तालुका नियंत्रण कक्ष :- ८३९०७३२०८३
7) जव्हार तालुका नियंत्रण कक्ष :- ८५५२९१८४०५
8) मोखाडा तालुका नियंत्रण कक्ष :- ९८५०९९८९२५

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण पालघर तर्फे जनहितार्थ

ji24news
Author: ji24news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Panchang

Gold & Silver Price

Top News

Advertisement

Our Visitor

0 1 0 8 2 9
Total Users : 10829

Covid Update

जि.प.उच्च प्राथ.शाळा बांधण शाळेत अक्षरधारा फाउंडेशन ट्रस्ट मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेतील होतकरू व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक शाहित्य.

आदिवासी हक्क संघर्ष समितीच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात संपन्न…

20 वर्षांपासून पुलाची प्रतीक्षा; हिरडपाडा ग्रामस्थांचा मतदान बहिष्काराचा इशारा.लेंडी नदीवरील कायमस्वरूपी पुलासाठी दोन दशकांचा संघर्ष; ८ हजार नागरिकांचा प्रश्न ऐरणीवर

अल्ट्रा चॅम्पियन ” विशाल वळवीच्या उत्कृष्ट कामगिरीचा आदिवासी बांधवांकडून सन्मान.

अतिवृष्टीमुळे सांबरपाड्याचा एकमेव रस्त्यावर दरड कोसळून; ग्रामस्थांची मोठी गैरसोय, आमदारांना दिलेल्या निवेदनानंतरही कार्यवाही नाही

विक्रमगड आठवडे बाजाराला भरभरून प्रतिसाद मात्र शौचालयाची असुविधा – जनतेसाठी मोठा प्रश्न ?

मोखाडा तालुक्यातील १० वी-१२ वी च्या विद्यार्थ्यांना आनंददायी परीक्षेसाठी वैशाली पाटील यांचे मार्गदर्शन.

रोमहर्षक सामन्यात के के किंग 11संघाची बाजी.

दुसऱ्या फ्रीस्टाईल स्केट कार्टींगच्या नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये मोखाडा तालुक्यातील गाडर भगिनींनी पटकवाले दोन गोल्ड व एक ब्रॉन्झ मेडल्स.

पालघर: एसटीच्या लहरी कारभारामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात; परीक्षेलाही पोहोचण्यास होतोय उशीर