ji24news

टिटवाळा शहरात उभ्या असलेल्या रिक्षात अजगर आढल्याने प्रवासी व रिक्षाचालकांची तारांबळ…!

टिटवाळा शहरात उभ्या असलेल्या रिक्षात अजगर आढल्याने प्रवासी व रिक्षाचालकांची तारांबळ…!

जोहार इंडिया न्यूज 24 (प्रतिनिधी )

टिटवाळा.

          पावसाळ्यात विषारी तसेच बिन विषारी साप मोठ्या प्रमाणात मानवीवस्तीत भक्ष्याच्या शोधात येत असल्याच्या घटना घडत आहे. अनेकदा मानवीवस्तीत भले मोठे साप आढळल्याच्या घटना समोर आला आहे.असाच काहीसा प्रकार टिटवाळा शहरात घडला आहे.

             टिटवाळ्यामध्ये रिक्षात भलामोठा अजगर येऊन बसल्याची घटना घडली आहे.टिटवाळा शहर परिसरात ही घटना घडली असून अजगराला पाहताच रिक्षा चालकासह प्रवाशांची पळापळ झाल्याचे पाहायला मिळाले. रिक्षामध्ये असलेल्या या अजगराचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
टिटवाळा परिसरात उभ्या असलेल्या रिक्षामध्ये तब्बल ५ फुटी अजगर शिरल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. यावेळी रिक्षाचालकाने प्रसंगावधान राखत वॉर फाऊंडेशनच्या सर्पमित्राला संपर्क साधला.
या घटनेची माहिती मिळताच सर्पमित्र सागर म्हात्रे ह्यांनी घटनास्थळी धाव घेत त्या अजगराला रिक्षातून पकडून एका ड्रममध्ये बंद केले. अजगराला पडकल्याचे पाहून रिक्षाचालकासह परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला. त्यानंतर अजगराला सुखरूप वनविभागाच्या ताब्यात देऊन निसर्गच्या सानिध्यात सोडून देण्यात आले आहे.

           दरम्यान, आपल्या परिसरात सर्प किंवा इतर काही वन्यजीव आढळल्यास त्यांना मारू नये, असे आवाहन सर्पमित्रांनी केले आहे. अशावेळी प्राणीमित्र किंवा वनविभागाला संपर्क साधावा. तसेच पावसाळ्यात बाहेर फिरताना किंवा कोणत्याही वाहनातून प्रवास करताना काळजी घ्यावी, असेही ते म्हणाले.

ji24news
Author: ji24news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Panchang

Gold & Silver Price

Top News

Advertisement

Our Visitor

0 1 0 8 2 8
Total Users : 10828

Covid Update

जि.प.उच्च प्राथ.शाळा बांधण शाळेत अक्षरधारा फाउंडेशन ट्रस्ट मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेतील होतकरू व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक शाहित्य.

आदिवासी हक्क संघर्ष समितीच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात संपन्न…

20 वर्षांपासून पुलाची प्रतीक्षा; हिरडपाडा ग्रामस्थांचा मतदान बहिष्काराचा इशारा.लेंडी नदीवरील कायमस्वरूपी पुलासाठी दोन दशकांचा संघर्ष; ८ हजार नागरिकांचा प्रश्न ऐरणीवर

अल्ट्रा चॅम्पियन ” विशाल वळवीच्या उत्कृष्ट कामगिरीचा आदिवासी बांधवांकडून सन्मान.

अतिवृष्टीमुळे सांबरपाड्याचा एकमेव रस्त्यावर दरड कोसळून; ग्रामस्थांची मोठी गैरसोय, आमदारांना दिलेल्या निवेदनानंतरही कार्यवाही नाही

विक्रमगड आठवडे बाजाराला भरभरून प्रतिसाद मात्र शौचालयाची असुविधा – जनतेसाठी मोठा प्रश्न ?

मोखाडा तालुक्यातील १० वी-१२ वी च्या विद्यार्थ्यांना आनंददायी परीक्षेसाठी वैशाली पाटील यांचे मार्गदर्शन.

रोमहर्षक सामन्यात के के किंग 11संघाची बाजी.

दुसऱ्या फ्रीस्टाईल स्केट कार्टींगच्या नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये मोखाडा तालुक्यातील गाडर भगिनींनी पटकवाले दोन गोल्ड व एक ब्रॉन्झ मेडल्स.

पालघर: एसटीच्या लहरी कारभारामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात; परीक्षेलाही पोहोचण्यास होतोय उशीर