
जोहार इंडिया न्यूज 24 (प्रतिनिधी )
मुंबई ;महाराष्ट्र राज्यातील एकमेव शासन मान्यता प्राप्त शिक्षक भारती संघटनेच्या १७ व्या वर्धापन दिनानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा…..!
शिक्षणाच्या हक्कासाठी – शिक्षकांच्या सन्मानासाठी हे ब्रीद घेऊन क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि ज्ञानज्योती फातिमा शेख यांचा आदर्श मानून गेली 17 वर्ष शिक्षक भारतीची राज्यभर घोडदौड सुरु आहे. गुरुवर्य अशोक बेलसरे सरांच्या नेतृत्वाखाली चांदा ते बांदा लढाऊ कार्यकर्त्यांची फळी तयार आहे. राज्यातील शिक्षकांची एकमेव शासनमान्यताप्राप्त संघटना आहे शिक्षक भारती.
शिक्षक भारती नुसती संघटना नाही. फुले-शाहू-आंबेडकर-गांधीजी आणि साने गुरुजी यांच्या विचारांचा वारसा पुढे घेऊन जाणारी ती चळवळ आहे.
6 ऑगस्ट 2005 रोजी स्थापन झालेल्या शिक्षक भारतीचा आज स्थापना दिवस.
शिक्षक भारतीचे सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी, हितचिंतक सर्वांना शुभेच्छा!
– आमदार कपिल पाटील.

शिक्षण हक्क आणि शिक्षक सन्मानाची लढाई…
6 ऑगस्ट 2005 रोजी स्थापन झालेल्या शिक्षक भारतीचा आज स्थापना दिवस. महाराष्ट्रभर शिक्षक भारतीचा पसारा वाढला आहे. याचं सर्व श्रेय शिक्षक भारतीच्या सर्व लढाऊ कार्यकर्त्यांचं आहे. आपले आमदार कपिल पाटील यांच्या साथीने असंच आपण सर्वांनी एकजूटीने काम करूया. शिक्षण हक्क आणि शिक्षक सन्मानाची लढाई अधिक व्यापक करूया.
लढूया, जिंकूया!
शिक्षक भारतीचे सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी, हितचिंतक सर्वांना शुभेच्छा!
– अशोक बेलसरे, अध्यक्ष, शिक्षक भारती

आपल्या शिक्षक भारती संघटनेच्या 17 व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने सर्वाना हार्दिक शुभेच्छा…. !!!!!
शुभेच्छुक…….
धनाजी पाटील.
कोकण विभागीय अध्यक्ष.
शिक्षक भारती महाराष्ट्र.
महाराष्ट्र राज्यातील एकमेव शासन मान्यता प्राप्त शिक्षक भारती संघटनेच्या १७ व्या वर्धापन दिनानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा ..!
शिक्षक भारती पालघर जिल्हा अध्यक्ष तथा सर्व पदाधिकारी पालघर..!
अनिल शेलार.

Total Users : 10829