ji24news

जागतिक आदिवासी दिनाचा कार्यक्रम विक्रमगड तालुक्यामध्ये मोठ्या उत्साहात संपन्न -…!

जागतिक आदिवासी दिनाचा कार्यक्रम विक्रमगड तालुक्यामध्ये मोठ्या उत्साहात संपन्न –

जोहार इंडिया न्यूज 24( विक्रमगड प्रतिनिधी )

विक्रमगड- दिनांक ९ ऑगस्ट २०२२ रोजी जागतिक आदिवासी दिनाचा कार्यक्रम विक्रमगड तालुक्यामध्ये मोठ्या उत्साहा मध्ये पार पडला. कार्यक्रमासाठी पंचक्रोशीतील बहुसंख्य आदिवासी बांधव,सरकारी कर्मचारी बांधव व सांस्कृतिक कला पथके उत्स्फूर्तपणे उपस्थित झाले होते. रॅलीत विविध आदिवासी सांस्कृतिक नाच, डीजेच्या तालावर नवीन आदिवासी गीते वाजवून आदिवासी बांधवांनी आपला आनंद व्यक्त केला.

           आदिवासी कार्यशक्ती समिती विक्रमगडच्या माध्यमातून तालुक्यातील सर्व पक्ष , संघटना व संस्था यांनी एकत्र येऊन ह्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. सकाळी दहा वाजता तारपा चौक विक्रमगड येथून सांस्कृतिक रॅलीला सुरुवात होऊन जुनी ग्रामपंचायत मार्गे मनोर पालघर रस्त्यावरून पुन्हा जुनी ग्रामपंचायत मार्गे मुख्य बाजारपेठ व छत्रपती शिवाजी महारज चौकातून रॅली पंचायत समिती विक्रमगड इथपर्यंत काढण्यात आली. त्यानंतर रॅलीचे रूपांतर सभे मध्ये करण्यात आले. ह्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून विक्रमगड च्या तहसीलदार श्रीमती चारुशीला पवार मॅडम, विक्रमगड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी – श्री. हनुमंतराव दोडके साहेब, विक्रमगडचे पोलीस निरीक्षक श्री प्रदीप गीते साहेब हे हजर होते. पंचायत समिती विक्रमगड येथील हॉल मध्ये झालेल्या ह्या कार्यक्रमात सर्वप्रथम उपस्थित मान्यवर व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते आदिवासी क्रांतिकारक वीर बिरसा मुंडा व राघोजी भांगरे यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आलं .कार्यक्रमाच्या अधक्षस्थानी आदिवासी कार्यशक्ती समिती विक्रमगड चे अध्यक्ष श्री राहुल धूम हे होते. ह्या कार्यक्रमांमध्ये विक्रमगड तालुका गुणवंत शेतकरी म्हणून सौ जानकीबाई सखाराम गुहे, श्री बंधू रामा गोविंद ,श्री अशोक शिवराम भोये गुणवंत महसूल कर्मचारी म्हणून श्री पुंडलिक अण्णाजी पाटील, गुणवंत स्वस्त धान्य दुकानदार म्हणून श्री नवसू मोरघा , फॉरेस्ट विभाग गुणवंत कर्मचारी श्रीमती रंजना भिका खांडवी ,आदिवासी संस्कृती रक्षक तूर वादक श्री राजा रामा गहला,आदिवासी संस्कृती रक्षक सोईन बाई श्रीमती . जानकी भिवा लाखन ,आदिवासी संस्कृती रक्षक डाक भगत- बात वाले श्री.सिताराम चौधरी, आदिवासी संस्कृती रक्षक धवलेरी बाई म्हणून श्रीमती. सुनंदा विष्णू वाघ, श्रीमती यमुना सुक्र्या वाघ, श्रीमती. सुनिता दामा सुतार ,आदिवासी संस्कृती रक्षक संबळ वाले श्री. अण्णा दामा सुतार, आदिवासी संस्कृती रक्षक ढोल वादक श्री .कृष्ण ठाकरे ,गुणवंत आशा वर्कर श्रीमती. संगीता विष्णू हाडल,गुणवंत अंगणवाडी कार्यकर्ती श्रीमती. संगीता वसंत वनगा, गुणवंत अंगणवाडी मदतनीस श्रीमती. वंदना शंकर चौधरी, विक्रमगड गुणवंत तलाठी श्रीमती सुनीता झुगरे, गुणवंत वैद्यकीय अधिकारी डॉक्टर.निशिगंध लक्ष्मण टोपले ,आदिवासी संस्कृती रक्षक तारपा वादक श्री. जयराम लखु वाडू,विक्रमगड गुणवंत खेळाडू कुमार. ज्ञानेश्वर विठ्ठल मोरघा, विक्रमगड गुणवंत आरोग्य सेवक श्री.सुधाकर लक्ष्या वाघलोडे, विक्रमगड गुणवंत ग्रामसेवक श्री.अमोल भोये ,विक्रमगड गुणवंत शिक्षक श्री. लक्ष्मण मिठया सुतार ,विक्रमगड गुणवंत पंचायत समिती अधिकारी श्री . ईश्वर बाळू पवार, विक्रमगड पोलीस मित्र श्री. रघुनाथ रामू चौधरी , विक्रमगड गुणवंत तंटामुक्त अध्यक्ष श्री. जाणू भोये,विक्रमगड गुणवंत पोलीस पाटील श्रीमती. शांतीबाई देवराम सातपुते ,विक्रमगड गुणवंत वारली पेंटर श्री. सुनील सोमा खरपडे , विक्रमगड गुणवंत कृषी सहाय्यक श्री. सांबरे साहेब आणि विक्रमगड आदिवासी रत्न म्हणून श्री यशवंत राघो वातास, अशा प्रकारे एकूण 31 विक्रमगड मधील गुणवंतांचा शाळ, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.त्याचप्रमाणे जिल्हा परिषद शाळा घाणेघर येथील नवोदय विद्यालय पालघर येथे निवड झालेल्या कुमार मयंक राजू डोले, कुमार वैभव तुकाराम राबळे व कुमार हार्दिक अंकुश मेढा ह्या विद्यार्थ्यांना वह्या, स्कूल बॅग व प्रत्येकी एक हजार रुपयांचा बक्षीस देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. सदर कार्यक्रमाला माननीय गटविकास अधिकारी श्री हनुमंतराव दोडके साहेब, विक्रमगड पोलीस निरीक्षक माननीय श्री. प्रदीप गीते साहेब विक्रमगड तसेच तहसीलदार श्रीमती. चारुशीला पवार मॅडम यांनी मार्गदर्शन केलं. कार्यक्रमांमध्ये श्री संतोष लाखन, श्री जगन्नाथ लक्ष्मण गवळी यांनी आपली मनोगत व्यक्त केली प्रास्ताविक श्री प्रकाश डोले यांनी केलं कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री मधुकर शेळके यांनी केलं.ह्या कार्यक्रमासाठी कार्यशक्ती समितीचे सचिव श्री.पुंडलिक धाकल फुफाणे,श्री.गणपत शेंडे,श्री.मधुकर चौधरी ,श्री दत्ता भडांगे.श्री.रमेश भरसट,श्री.वामन कवळे,श्री.सुनील टोपले,श्री.सुनील बोरसे,श्री.अजय जाधव,श्री.मोहन गुहे,श्री.रामू सुतार व कार्यशक्ती समिती विक्रमगड च्या सर्व सदस्यांनी मोलाचे सहकार्य व योगदान दिले.

ji24news
Author: ji24news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Panchang

Gold & Silver Price

Top News

Advertisement

Our Visitor

0 1 0 8 2 9
Total Users : 10829

Covid Update

जि.प.उच्च प्राथ.शाळा बांधण शाळेत अक्षरधारा फाउंडेशन ट्रस्ट मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेतील होतकरू व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक शाहित्य.

आदिवासी हक्क संघर्ष समितीच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात संपन्न…

20 वर्षांपासून पुलाची प्रतीक्षा; हिरडपाडा ग्रामस्थांचा मतदान बहिष्काराचा इशारा.लेंडी नदीवरील कायमस्वरूपी पुलासाठी दोन दशकांचा संघर्ष; ८ हजार नागरिकांचा प्रश्न ऐरणीवर

अल्ट्रा चॅम्पियन ” विशाल वळवीच्या उत्कृष्ट कामगिरीचा आदिवासी बांधवांकडून सन्मान.

अतिवृष्टीमुळे सांबरपाड्याचा एकमेव रस्त्यावर दरड कोसळून; ग्रामस्थांची मोठी गैरसोय, आमदारांना दिलेल्या निवेदनानंतरही कार्यवाही नाही

विक्रमगड आठवडे बाजाराला भरभरून प्रतिसाद मात्र शौचालयाची असुविधा – जनतेसाठी मोठा प्रश्न ?

मोखाडा तालुक्यातील १० वी-१२ वी च्या विद्यार्थ्यांना आनंददायी परीक्षेसाठी वैशाली पाटील यांचे मार्गदर्शन.

रोमहर्षक सामन्यात के के किंग 11संघाची बाजी.

दुसऱ्या फ्रीस्टाईल स्केट कार्टींगच्या नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये मोखाडा तालुक्यातील गाडर भगिनींनी पटकवाले दोन गोल्ड व एक ब्रॉन्झ मेडल्स.

पालघर: एसटीच्या लहरी कारभारामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात; परीक्षेलाही पोहोचण्यास होतोय उशीर