ji24news

जागतिक आदिवासी दिनानिमित्त वाडा ग्रामिण रुग्णालय येथे भव्य रक्तदान शिबिर सपन्न. .!

जोहार इंडिया न्यूज 24 (प्रतिनिधी )

जागतिक आदिवासी दिनानिमित्त वाडा ग्रामिण रुग्णालय येथे भव्य रक्तदान शिबिर सपन्न. .! 

रक्त कर्ण प्रा . किरण थोरात सर .

 

          वाडा तालुका .आदिवासी मुक्ती मोर्चा सामाजिक संघटना वाडा तालुका कमिटीच्या वतीने ९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनानिमित्त ग्रामिण रुग्णालय वाडा येथे सकाळी १० ते सायंकाळी ०३ वा. या दरम्यान रक्तदान शिबिर सपन्न झाले.

पालघर जिल्हामध्ये सर्वच तालुक्यामध्ये जागतिक आदिवासी दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाते,रँली,सांस्कृतिक कार्यक्रम,आदिवासी संस्कृती,चालिरिती,परंपरेचे दर्शन या दिवशी पाहायला मिळते.

वाडा तालुक्यामध्ये आदिवासी मुक्ती मोर्चा सामाजिक संघटना वाडा तालुका कमिटीच्या वतीने सेवाभावी कार्यक्रम म्हणजेच भव्य रक्तदान शिबिर आयोजित केले. संपुर्ण पालघर जिल्हामध्ये जागतिक आदिवासी दिनानिमित्त असा आरोग्याच्या दृष्टीने एकमेव कार्यक्रम आयोजित केल्यामुळे सर्वत्र कौतुक होत आहे.

वाडा तालुक्यात संयुक्त उत्सव कमिटी मार्फत जागतिक आदिवासी दिनानिमित्त रँलीचे आयोजन केले होते,त्यामध्ये तालुक्यातील सर्वच आदिवासी संघटना,सामाजिक संस्था,शिक्षक संघटना,त्याच बरोबर तालुक्यातील समाज बांधव सहभागी झाले होते.

आदिवासी मुक्ती मोर्चा सामाजिक संघटना वाडा तालुका कमिटी आयोजित आदिवासी दिनानिमित्त वाडा ग्रामिण रुग्णालय येथे भव्य रक्तदान शिबिर सपन्न झाले,७४ रक्तदात्यांनी या रक्तदान शिबिरात रक्तदान केले विशेष म्हणजे महिलांचाही सहभाग चांगला होता त्यामुळे संघटनेच्या वतीने सर्वच रक्तदात्यांचे आभार मानण्यात आले.

संपुर्ण पालघर जिल्हामध्ये जागतिक आदिवासी दिनानिमित्त आरोग्य दृष्टीने अत्यंत महत्वाचा असलेला कार्यक्रम म्हणजे रक्तदान शिबिराचे आयोजन केल्याबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.

या कार्यक्रम प्रसंगी आदिवासी मुक्ती मोर्चा सामाजिक संघटनेचे अध्यक्ष मा. अनंता वनगा,जिल्हा कमिटी अध्यक्ष मा. अरुण खुलात,जिल्हा कमिटी संघटक मा. नितिन दळवी,वाडा तालुका कमिटी अध्यक्ष मा.दयानंद हरळ,उपाध्यक्ष मा.संतोष जांजर , उपाध्यक्ष मा. आदेश पाटील,सचिव मा नितिन तरे,सहसचिव मा.मुकेश वाकडे,कार्याध्यक्ष मा. वसंत धोदडे , संपर्क प्रमुख मा.लहु बसवंत,संघटक मा. किरण कवटे,वाडा शहर कमिटी उपाध्यक्ष मा.सुनिल तुंबडा,सचिव नरेश ठाणगे,वैभव भोमटे,सुदाम उंबरसाडा,अर्जुन गडग,तसेच असंख्य तालुका कमिटी पदाधिकारी , शहर कमिटी पदाधिकारी उपस्थित होते.

        रक्तदान शिबिरासाठी पतंगशाह कुटीर रुग्णालय शासकिय रक्तपेढी जव्हारची टिम,रक्तकर्ण ग्रुपचे प्रा. किरण थोरात सर ,डॉ.भडांगे सर ग्रामिण रुग्णालय वाडा,वाडा शहर व तालुक्यातील रक्तदान करणारे सर्व रक्तदाते,पत्रकार तसेच या शिबिरासाठी सरळहस्ते मदत करणारे यांचे आयोजकांकडुन आभार !

                                           रक्त कर्ण प्रा . किरण थोरात सर .

ji24news
Author: ji24news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Panchang

Gold & Silver Price

Top News

Advertisement

Our Visitor

0 1 0 8 2 9
Total Users : 10829

Covid Update

जि.प.उच्च प्राथ.शाळा बांधण शाळेत अक्षरधारा फाउंडेशन ट्रस्ट मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेतील होतकरू व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक शाहित्य.

आदिवासी हक्क संघर्ष समितीच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात संपन्न…

20 वर्षांपासून पुलाची प्रतीक्षा; हिरडपाडा ग्रामस्थांचा मतदान बहिष्काराचा इशारा.लेंडी नदीवरील कायमस्वरूपी पुलासाठी दोन दशकांचा संघर्ष; ८ हजार नागरिकांचा प्रश्न ऐरणीवर

अल्ट्रा चॅम्पियन ” विशाल वळवीच्या उत्कृष्ट कामगिरीचा आदिवासी बांधवांकडून सन्मान.

अतिवृष्टीमुळे सांबरपाड्याचा एकमेव रस्त्यावर दरड कोसळून; ग्रामस्थांची मोठी गैरसोय, आमदारांना दिलेल्या निवेदनानंतरही कार्यवाही नाही

विक्रमगड आठवडे बाजाराला भरभरून प्रतिसाद मात्र शौचालयाची असुविधा – जनतेसाठी मोठा प्रश्न ?

मोखाडा तालुक्यातील १० वी-१२ वी च्या विद्यार्थ्यांना आनंददायी परीक्षेसाठी वैशाली पाटील यांचे मार्गदर्शन.

रोमहर्षक सामन्यात के के किंग 11संघाची बाजी.

दुसऱ्या फ्रीस्टाईल स्केट कार्टींगच्या नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये मोखाडा तालुक्यातील गाडर भगिनींनी पटकवाले दोन गोल्ड व एक ब्रॉन्झ मेडल्स.

पालघर: एसटीच्या लहरी कारभारामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात; परीक्षेलाही पोहोचण्यास होतोय उशीर