
जागतिक आदिवासी दिन जव्हार मध्ये,जल्लोषात साजरा
—-भर पावसात तरुणाईचा उत्साह कायम.
हजारोंच्या संख्येने जनसमुदाय लोटला…..!
जोहार इंडिया न्यूज 24 (प्रतिनिधी )
सौरभ कामडी मोखाडा प्रतिनिधी
दि.१०आँगस्ट२०२२.
जव्हार शहरात आदिवासी बांधवांकडून जागतिक आदिवासी दिन मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला.पावसामुळे कार्यक्रमावर सावट होते परंतु तरुणाईचा उत्साह,जोश कायम होता. मागील दोन वर्षामध्ये,कोरोना महामारीने कार्यक्रम होऊ शकले नव्हते.माञ यावर्षी नव्या उमेदीने आदिवासी बांधवांकडून आदिवासी दिन दिमाखात साजरा करण्यात आला.
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पातर्फे आदिवासी बांधवांचे कार्यक्रम ठेवले होते.त्यात पारंपारिक पोशाखात कलाकारांनी नृत्य आविष्कार साजर केले.शहरातील खंडोबा मंदिरापासुन आदिवासी युवा संघाकडून हिरवा देवाची भव्य मिरवणुक काढली होती.या मिरवणूकीत हजारोच्या संख्येने आदिवासी बांधव सहभागी झाले होते.तसेच मोटर सायकल रँली हि काढली होती.मिरवणुकीत आदिवासी पारंपारिक नृत्य,ढोल नाच,संबळ नाच,गौरी नाच,मादोळ नाच,तारपा नाच, होडी नाचविणे,विविध प्राण्यांची वेशभुषा करुन सोंगे नाचविण्यात आली.ह्या पारंपारिक नृत्यांमुळे कार्यक्रमांची शोभा वाढली होती.
हिरव्या देवाची हि भव्य मिरवणूक खंडोबा मंदिरापासुन आंबिका चौक,तारपा चौक,गांधी चौक,आझाद चौक ,पाचबत्ती, विजयस्तंभ मार्गे गोरवाडी कडून आदिवासी क्रांतीवीर चौकात आदिवासी क्रांतीवीरांना अभिवादन करुन मिरवणुकीची सांगता झाली.मिरवणुकीत पोलिस प्रशासनाकडुन चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यावेळी आदिवासी युवा संघाकडून विजेत्या आदिवासी कला पथकांना पारितोषिके देण्यात आली.आदिवासी प्रकल्प कार्यालयाकडून कार्यक्रमात आलेल्या आदिवासी बांधवांसाठी भोजनाची व्यवस्था केली होती. आदिवासी दिनाचा हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी आदिवासी समाजाच्या सर्व बांधवांनी विशेष परिश्रम घेतले.

Total Users : 10829