ji24news

राजभवन मुंबई येथे स्वातंत्र्य सुवर्णमहोत्सवी वर्षा निमित्त क्रीश स्पोर्टस फाऊंडेशन रक्षाबंधनाच्या कार्यक्रमाचे आयोजन….!

राजभवन मुंबई येथे स्वातंत्र्य सुवर्णमहोत्सवी वर्षा निमित्त क्रीश स्पोर्टस फाऊंडेशन रक्षाबंधनाच्या कार्यक्रमाचे आयोजन….!

जोहार इंडिया न्यूज 24 (प्रतिनिधी.

        पालघर जिल्हा .आपल्या देशाच्या स्वातंत्र्य सुवर्णमहोत्सवी वर्षा निमित्त क्रीश स्पोर्टस फाऊंडेशन यांनी अनुसूचित जमातीसाठी राजभवन मुंबई येथे रक्षाबंधनाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

सदर कार्यक्रमासाठी पालघर जिल्ह्यातील काही निवडक व्यक्तींची निवड करण्यात आली होती. यामध्ये पारंपरिक आदिवासी नूर्त्य कलाकार, वारली चित्रकार ई. समावेश होता.

नियोजनाप्रमाणे कार्यक्रम सकाळी११:३० वाजता सुरु झाला. सुरवातीला राजभवनाच्या प्रवेश द्वाराजवळ मा. राज्यपाल महोदय श्री. भगतसिंह कोशारी साहेबांनी आदिवासी समाजाचे आमंत्रित मान्यवर व कलाकार यांच्या सोबत फोटो काढले.

राजभवनात प्रवेश करताच चार टेबल लावले होते. त्यात वारली चित्रकार विजय वाडु,खगोलशास्त्रज्ञ चंद्रकांत घाटाळ, बाबु वस्तु कलाकार वनश्या भुजड यांचा व ग्राम मंगल शाळेचे कलाशिक्षक यांचा समावेश होता.

व्यासपीठावर मा. राज्यपाल यांचे स्वागत क्रीश स्पोर्टसचे सर्वेसर्वा नवीन शेट्टी यांनी केले. त्यानंतर ग्राममंगल शाळेतील शिक्षिकांनी व इतर आदिवासी महिलांनी मा. राज्यपाल यांना राख्या बांधल्या. नंतर जव्हार येथील कलापथकाने पारंपारिक गवरीनाच व तारपानाच केला. त्यानंतर आदिवासी समाजातील मान्यवर यांत बांबु पासुन विविध वस्तु तयार करणारे वनश्या भुजड, आदिवासी खगोलशास्त्रज्ञ चंद्रकांत घाटाळ, वारली चित्रकार विजय वाडु तसेच कवी रवी बुधर यांचा शाल श्रीफळ देवुन क्रीश स्पोर्टस फाऊंडेशन चे अध्यक्ष श्री.नवीन शेट्टी व त्यांच्या पत्नी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्र संचालक जव्हार तालुक्यातील प्रसिध्द कवी रवी बुधरसर यांनी केले.

कार्यक्रम आटोपल्यानंतर सगळ्या पाहुण्यांच्या जेवणाची सोय राजभवनात करण्यात आली होती. जेवणानंतर राजभवन दर्शन कार्यक्रमात म्युझियम व राजभवन परिसरातील सर्वच इमारतींचे ऐतिहासिक महत्व यांची माहिती देण्यात आली.

मा. राज्यपाल महोदय यांचा कार्यक्रम असल्याने कार्यक्रमाचे नियोजन अतिशय सुनियोजित पणे करण्यात आले होते. यामध्ये सर्वच पाहुण्यांची पाच दिवस आधिच कागदपत्र मागवून त्यांची यादी राजभवनात सादर करावी लागते. त्याशिवाय किंव्हा वेळेवर कोणालाही प्रवेश दिला जात नाही. तर ही संपूर्ण जबाबदारी संस्थेचे सदस्य श्री. प्रमोद कदमसर यांनी पार पाडली.

ji24news
Author: ji24news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Panchang

Gold & Silver Price

Top News

Advertisement

Our Visitor

0 1 0 8 2 9
Total Users : 10829

Covid Update

जि.प.उच्च प्राथ.शाळा बांधण शाळेत अक्षरधारा फाउंडेशन ट्रस्ट मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेतील होतकरू व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक शाहित्य.

आदिवासी हक्क संघर्ष समितीच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात संपन्न…

20 वर्षांपासून पुलाची प्रतीक्षा; हिरडपाडा ग्रामस्थांचा मतदान बहिष्काराचा इशारा.लेंडी नदीवरील कायमस्वरूपी पुलासाठी दोन दशकांचा संघर्ष; ८ हजार नागरिकांचा प्रश्न ऐरणीवर

अल्ट्रा चॅम्पियन ” विशाल वळवीच्या उत्कृष्ट कामगिरीचा आदिवासी बांधवांकडून सन्मान.

अतिवृष्टीमुळे सांबरपाड्याचा एकमेव रस्त्यावर दरड कोसळून; ग्रामस्थांची मोठी गैरसोय, आमदारांना दिलेल्या निवेदनानंतरही कार्यवाही नाही

विक्रमगड आठवडे बाजाराला भरभरून प्रतिसाद मात्र शौचालयाची असुविधा – जनतेसाठी मोठा प्रश्न ?

मोखाडा तालुक्यातील १० वी-१२ वी च्या विद्यार्थ्यांना आनंददायी परीक्षेसाठी वैशाली पाटील यांचे मार्गदर्शन.

रोमहर्षक सामन्यात के के किंग 11संघाची बाजी.

दुसऱ्या फ्रीस्टाईल स्केट कार्टींगच्या नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये मोखाडा तालुक्यातील गाडर भगिनींनी पटकवाले दोन गोल्ड व एक ब्रॉन्झ मेडल्स.

पालघर: एसटीच्या लहरी कारभारामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात; परीक्षेलाही पोहोचण्यास होतोय उशीर