
75 वा स्वातंत्र्य दिन अमृत महोत्सवी देवखोप VBHC येथे साजरा…..!
जोहार इंडिया न्यूज 24 (प्रतिनिधी )
पालघर जिल्हा . देवकोप गाव येतील व्ही बी एस सी गृह संकुल मध्ये ग्रीन वूड्स सी एच एस असोसि..एशन लिमिटेड व ग्रीन ग्लेड सी एच एस असोसिएशन लिमिटेड यांनी 75 व स्वातंत्र्य दिन मोठ्या हर्ष उल्हासहाणि साजरा केला साजरा केला.
भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हर घर तिरंगा अभियान ला ग्रीन वूड्स आणि ग्रीन ग्लेड मधल्या सर्व रहिवाशांनी सहभाग घेतला.
ग्रीन वूड्स व ग्रीन लेड सी एच एस हाऊसिंग असोसिएशन यांनी 75 व्या स्वातंत्र्य दिन निमित्त मुख्य अतिथी म्हणून माननीय श्री प्रकाश गायकवाड अप्पर पोलीस अधीक्षक पालघर जिल्हा व माननीय अतिथी म्हणून श्री नितीन जयराम थालेकर महाराष्ट्र राज्य शिक्षक भरती जिल्हाध्यक्ष पालघर जिल्हा , श्री विनोद गणपत थालेकर ग्रामपंचायत सदस्य गाव देवकोप व श्री निलेश विनायक देवरे ग्राम विकास अधिकारी ग्रुप ग्रामपंचायत नंडोरे देवकोप हे उपस्थित होते.
श्री प्रकाश गायकवाड अप्पर पोलीस अधीक्षक पालघर जिल्हा यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
आबाचा पाडा गावातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शालेय विद्यार्थी यांचा गुणगौरव सोहळा श्री प्रकाश गायकवाड व श्री केतन चव्हाण व्यवस्थापकीय संपादक सतर्क पोलीस टाइम्स यांच्या हस्ते करण्यात आला.
ग्रीन वूड्स सी एच एस असोसिएशन लिमिटेड व ग्रीन ग्लेड सी एच एस असोसिएशन लिमिटेड च्या रहिवाशांनी सांस्कृतिक कार्यक्रम चे आयोजन करण्यात आले होते येथील सर्वांनी लहान थोर मंडळींनी याच्या सहभाग घेऊन कार्यक्रम साजरा केला.
माननीय मुख्य अतिथी श्री प्रकाश गायकवाड अप्पर पोलीस अधीक्षक व माननीय अतिथी श्री नितीन जयराम थालेकर आणि श्री निलेश विनायक देवरे यांनी आपल्या भाषणातून सर्वांना त्यांचे मूल्यवान मार्गदर्शन केले.
श्री प्रकाश गायकवाड सर यांनी सर्व सोसायटीच्या सदस्यांना व गावातली विद्यार्थी, ग्रामपंचायत पदाधिकारी यांना आपल्या भाषणातून मौल्यवान असे मार्गदर्शन केले. गावातल्या नवीन पिढीसाठी शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले व पुढील स्पर्धा परीक्षेसाठी काही मार्गदर्शन लागलं तर त्यांची साथ लाभेल असा आश्वासन दिले. सोसायटीमध्ये एक ग्रंथालय असावं असाही सल्ला साहेबांनी आपल्या भाषणातून दिला जेणेकरून विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी एक मोकळी जागा प्राप्त होईल. श्री प्रकाश गायकवाड यांनी सर्व पदाधिकारी व सदस्य यांचे कार्यक्रमाच्या व्यवस्थापन योग्य रीतीने यशस्वीपणे पार पाडल्याबद्दल कौतुक केले. श्री प्रकाश गायकवाड साहेबांनी सतर्क पोलीस टाईम चे माध्यमिक व उच्च माध्यमिक मुलांसाठी पुरस्कार चे आयोजन केल्याबद्दल कौतुक माध्यमिक व उच्च माध्यमिक मुलांसाठी पुरस्कार चे आयोजन केल्याबद्दल कौतुक केले व सतर्क पोलीस टाइम्स च्या पुढच्या वाटचाली साठी शुभेच्छा दिल्या.
श्री नितीन जयराम थालेकर सरांनी आपल्या भाषणातून पालघर मधील हुतात्म्यांचा महत्व व माहिती सर्व सदस्यांना दिली व 14 ऑगस्ट हा हुतात्मा दिवस म्हणून पालघर मध्ये साजरा केला जातो हे सांगितलं.सर्वांचे कौतुक केले व शालेय विद्यार्थी माध्यमिक व उच्च माध्यमिक यांच्या गुणगौरव करत त्यांच्या पुढच्या वाटचाली व शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या व सर्वांना पुस्तकाचे महत्व पटवून दिले. त्यांनी आपल्या भाषणातून सोसायटीच्या सदस्यांना ग्रामपंचायत शाळा व इतर आदिवासी विद्यार्थी व मुलं यांच्याकरिता काही चांगली उपक्रम राबवावे अशी विनंती केली.
सतर्क पोलीस टाइम्स च्या वतीने माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळे विद्यार्थी चा गुणगौरव पुरस्कार देऊन अभिनंदन केले.
या कार्यक्रम ग्रीन वुड्स व ग्रीन ग्लेड चे सर्व पदाधिकारी व सदस्य यांनी एकत्र येऊन यशस्वीपणे येथे पार पाडला. कार्यक्रमाला ग्रीनवट्स सी एच एस चे चेअरमन श्री राज ढेरे , सेक्रेटरी श्री कुशल सिंग रावत. व ग्रीन ग्लेड सी एच एस हाऊसिंग असोसिएशन चे सेक्रेटरी श्री सुनील पवार, खजिनदार श्री मंगेश दोडल, सौ अमृता सिंग, पदाधिकारी श्री संजय भट श्री राठोड श्रीपंत श्री संदीप शिंदे श्री प्रमोद खांबे श्री राकेश गिरी श्री महेंद्र पाडवी व इतर लोकांचे योगदान मिळाले.
Total Users : 10829