ji24news

देशाला पहिल्या आदिवासी महिला राष्ट्रपती तरी आदिवासांची परवड सुरूच आहे,आमदार कपिल पाटील यांनी व्यक्त केली खंत ..!

देशाला पहिल्या आदिवासी महिला राष्ट्रपती तरी आदिवासांची परवड सुरूच आहे,आमदार कपिल पाटील यांनी व्यक्त केली खंत ..!

जोहार इंडिया न्यूज 24 (प्रतिनिधी )

मुंबई : आदिवासी पाडे आणि दुर्गम भागात मूलभूत सोयीसुविधा (Basic Amenities) पोहोचत नाहीत. पालघर जिल्ह्यातील मोखाड्यातील अतिदुर्गम बोटोशी गावातील मरकटवाडी इथे ही हृदयद्रावक घटनेचा दाखला पाटील यांनी यावेळी दिला.

                    या गावात रस्ता नसल्याने वंदना बुधर या गर्भवती महिलेला आरोग्य सेवा मिळवण्यासाठी तीन किलोमीटर डोलीतून पायपीट करत दवाखाना गाठावा लागला.

         विधान परिषदेत नवनिर्वाचित राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती यांच्या अभिनंदन ठरावावर बोलताना आमदार कपिल पाटील. त्यावेळी आदिवासींचे प्रश्न आणि राज्याच्या आदिवासी विभागाच्या निधीबाबत त्यांनी सभागृहाचे लक्ष वेधले.
           देशाला पहिल्या आदिवासी महिला राष्ट्रपती ( India Got First Tribal Woman President) मिळाल्या असल्या तरीही देशातील आदिवासांची (Adiwasi) परवड सुरू आहे, अशा शब्दात आमदार कपिल पाटील (MLA Kapil Patil) यांनी खंत व्यक्त केली. अधिवेशाच्या पहिल्या दिवशी (Maharashtra Assembly Session) राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (President Draupadi Murmu) यांचा अभिनंदन प्रस्ताव (Congratulations Proposal) मांडण्यात आला, त्यावेळी पाटील बोलत होते.
आदिवासी पाडे आणि दुर्गम भागात मूलभूत सोयीसुविधा (Basic Amenities) पोहोचत नाहीत. पालघर जिल्ह्यातील मोखाड्यातील अतिदुर्गम बोटोशी गावातील मरकटवाडी इथे ही हृदयद्रावक घटनेचा दाखला पाटील यांनी यावेळी दिला. या गावात रस्ता नसल्याने वंदना बुधर या गर्भवती महिलेला आरोग्य सेवा मिळवण्यासाठी तीन किलोमीटर डोलीतून पायपीट करत दवाखाना गाठावा लागला. परंतु आरोग्य सेवा उपलब्ध न झाल्याने तिला तिच्या जुळ्या बालकांचा मृत्यू डोळ्यादेखत पाहावा लागला असल्याचेही पाटील यांनी सांगितले. त्यामुळे मुर्मू या देशाच्या सर्वोच्च स्थानावर विराजमान झाल्यानंतर देशातील आदिवासींचे प्रश्न नक्कीच मार्गी लागतील, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.

        द्रौपदी मुर्मू यांचे दुःख हे महाभारतातील द्रौपदीपेक्षाही अधिक आहे. आदिवासींची होणारी फरफट त्यांनी जवळून पाहिली आहे. त्यामुळे आता आदिवासींच्या शिष्यवृत्तीचे पैसे, शिक्षण, गर्भवती स्त्रियांच्या मृत्यूची दखलही मुर्मू घेतील असेही पाटील यांनी शेवटी नमूद केले.

ji24news
Author: ji24news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Panchang

Gold & Silver Price

Top News

Advertisement

Our Visitor

0 1 0 8 2 8
Total Users : 10828

Covid Update

जि.प.उच्च प्राथ.शाळा बांधण शाळेत अक्षरधारा फाउंडेशन ट्रस्ट मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेतील होतकरू व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक शाहित्य.

आदिवासी हक्क संघर्ष समितीच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात संपन्न…

20 वर्षांपासून पुलाची प्रतीक्षा; हिरडपाडा ग्रामस्थांचा मतदान बहिष्काराचा इशारा.लेंडी नदीवरील कायमस्वरूपी पुलासाठी दोन दशकांचा संघर्ष; ८ हजार नागरिकांचा प्रश्न ऐरणीवर

अल्ट्रा चॅम्पियन ” विशाल वळवीच्या उत्कृष्ट कामगिरीचा आदिवासी बांधवांकडून सन्मान.

अतिवृष्टीमुळे सांबरपाड्याचा एकमेव रस्त्यावर दरड कोसळून; ग्रामस्थांची मोठी गैरसोय, आमदारांना दिलेल्या निवेदनानंतरही कार्यवाही नाही

विक्रमगड आठवडे बाजाराला भरभरून प्रतिसाद मात्र शौचालयाची असुविधा – जनतेसाठी मोठा प्रश्न ?

मोखाडा तालुक्यातील १० वी-१२ वी च्या विद्यार्थ्यांना आनंददायी परीक्षेसाठी वैशाली पाटील यांचे मार्गदर्शन.

रोमहर्षक सामन्यात के के किंग 11संघाची बाजी.

दुसऱ्या फ्रीस्टाईल स्केट कार्टींगच्या नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये मोखाडा तालुक्यातील गाडर भगिनींनी पटकवाले दोन गोल्ड व एक ब्रॉन्झ मेडल्स.

पालघर: एसटीच्या लहरी कारभारामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात; परीक्षेलाही पोहोचण्यास होतोय उशीर