
श्री गणेश विद्यामंदिर शाळेत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव दिन साजरा….!
जोहार इंडिया न्यूज 24 (प्रतिनिधी )
दिवा – (सचिन शेलवले )
दि .15/8/2022 रोजी शिवदत्त ज्ञान प्रसारक मंडळ संचालित, श्री गणेश विद्यामंदिर लिलावती कला, वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय, वीर जिजाऊ बाल संस्कार केंद्र, किड्स कॅम्प, माय मदर इंग्लिश स्कूल या शाळेत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला .प्रथमता सकाळी 7.00 च्या दरम्यान ढोल ताशांच्या गजरात मुलांनी शाळेपासून आगासन पर्यंत व आगासन पासून एस .एम .जी पर्यंत प्रभात फेरी विद्यार्थ्यांची काढण्यात आली .
त्यात महापुरुषांच्या घोषणा ,प्रत्येक मुलांच्या हातात तिरंगी झेंडे तसेच चालत असताना समुहगान म्हणत मुलांनी प्रभात फेरी काढली .त्यानंतर शाळेच्या प्रांगणात संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती लीलावती लक्ष्मण म्हात्रे मॅडम यांच्या हस्ते ध्वज फडकविण्यात आला .त्यानंतर कार्यक्रमात मुला-मुलींची भाषणे झाली . अनेक समुहगान मुलांनी पेटी, ढोलकीच्या ताला सुरात म्हटले . स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त व्यासपीठावर संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती लीलावती म्हात्रे मॅडम ,सचिव साईनाथ म्हात्रे , दिनेश म्हात्रे, केतकी म्हात्रे मॅडम ,गीता म्हात्रे मॅडम हे पदाधिकारी तसेच प्रमुख पाहुणे शशिकांत पाटील, नवनीत बेडेकर व श्रीकांत पाटील हे मान्यवर उपस्थित होते. तसेच श्री गणेश विद्यामंदिर माध्यमिक विभाग या मागील शैक्षणिक वर्षात इयत्ता दहावी मध्ये बारावी मध्ये तसेच आर्ट ,कॉमर्स , सायन्स तसेच माय मदर इंग्लिश स्कूल मध्ये दहावी मध्ये प्रथम क्रमांक ला 5000 रुपये रोख पारितोषिक ,द्वितीय क्रमांकाला 3000 रुपये तसेच तृतीय क्रमांकाला 2000 रुपयाचे रोख पारितोषिक पाहुण्यांच्या हस्ते देण्यात आले .
संस्थेचे सचिव साईनाथ म्हात्रे यांनी आपल्या भाषणात या शाळेतील मुलींची प्रगती मुलांपेक्षा अधिक दिसून येते . दिव्यातील मुलांसाठी शिक्षणाची सोय व्हावी . बाहेर जायला लागू नये म्हणून माझ्या वडिलांनी इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतचे शिक्षण दिव्यातच मिळावे म्हणून शैक्षणिक संस्था उभारली होती . तसेच पुढील डिग्रीच्या शिक्षणासाठी सुद्धा बाहेर न जाता त्यांची सोय सुद्धा दिव्यातच व्हावी म्हणून त्यांनी दुसरी त्यासाठी भव्य दिव्य अशी इमारत बांधली . हे त्यांचे स्वप्न असेच अधुरे राहिले . ते स्वप्न पूर्ण करण्याचे आश्वासन आम्ही सर्वजण देत आहोत . असे आपल्या भाषणातून साईनाथ म्हात्रे साहेबांनी सांगितले .हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री गणेश विद्यामंदिर चे प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक ,बाल संस्कार केंद्र, माय मदर इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक तसेच शिक्षक वृंद यांनीअथक परिश्रम घेतले . तसेच या कार्यक्रमाला माजी विद्यार्थ्यांनी सुद्धा हजेरी लावली होती . त्यांचे सुद्धा संस्थेतर्फेआभार मानले .कार्यक्रमाची सांगता ‘वंदे मातरम ‘या गीताने झाली .

Total Users : 10828