ji24news

उमरोळी येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएमवर चोरट्यांनी डल्ला मारून 14 लाख 50 हजार रुपयाची रोकड लुटून पोबारा…!

उमरोळी येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएमवर चोरट्यांनी
डल्ला मारून 14 लाख 50 हजार रुपयाची रोकड लुटून पोबारा…!

जोहार इंडिया न्यूज 24 (प्रतिनिधी )

पालघर जिल्हा ;उमरोळी येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएमवर चोरट्यांनी
डल्ला मारून 14 लाख 50 हजार रुपयाची रोकड लुटून पोबारा केल्याची घटना घडली आहे.

तर विराथन बुद्रुक येथील एका घरातून 8 लाख 94 हजार रुपये किमतीचे 28 तोळे किमतीचे दागिने आणि 40 हजारांची रोकड लंपास करण्यात चोरट्यांना यश आले आहे.
वारंवार होणार्‍या चोर्‍यांमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. चोरट्यांनी शनिवारी मध्यरात्री उमरोळी येथील एटीएम मशीन असलेल्या केबिनचा प्रथम (शटर) दरवाजा तोडून हे एटीएम मशीन फोडून त्यातील 14 लाख 50 हजार रुपये लुटून नेल्याची घटना घडली आहे.
चोरट्यांनी आपल्या चेहर्‍यावर मास्क बांधले होते. तसेच चोरांनी चारचाकी वाहनाचा वापर केला असल्याची शंका व्यक्त
करण्यात येत आहे. तसेच ते पालघरच्या दिशेकडून आले असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. दुसर्‍या घटनेत वसई-विरार
महानगरपालिकेत आरोग्य विभागात असलेले राकेश वसंत म्हात्रे विराथन बुद्रुक येथे कुटुंबासमवेत राहतात. तसेच त्यांच्या दुसर्‍या घराचे बांधकाम सुरू आहे. त्यांचे भाऊ आणि ते तिथे राहत असलेल्या वाढीव बांधकामावरून किरकोळ असा वाद निर्माण झाल्याने
ते आपापल्या खोल्या बंद करून कामालाही गेले. मात्र, सायंकाळी घरी आले असता त्यांच्या घराचे कुलूप तोडून त्यातील सुमारे 10 लाख रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला. लागलीच त्यांनी पोलिसांना ही खबर दिल्यानंतर हे क्षेत्र कोणत्या पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येते
यावरूनही काही वेळ तपास थांबला होता. अवघ्या दोन चार तासांतच ही चोरी झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांना तपासकामी सहकार्य करण्यात आले असून आजतागायत कोणत्याही प्रकारचा तपास होवू शकला नसल्याचे
बोलले जात आहे.

ji24news
Author: ji24news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Panchang

Gold & Silver Price

Top News

Advertisement

Our Visitor

0 1 0 8 2 9
Total Users : 10829

Covid Update

जि.प.उच्च प्राथ.शाळा बांधण शाळेत अक्षरधारा फाउंडेशन ट्रस्ट मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेतील होतकरू व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक शाहित्य.

आदिवासी हक्क संघर्ष समितीच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात संपन्न…

20 वर्षांपासून पुलाची प्रतीक्षा; हिरडपाडा ग्रामस्थांचा मतदान बहिष्काराचा इशारा.लेंडी नदीवरील कायमस्वरूपी पुलासाठी दोन दशकांचा संघर्ष; ८ हजार नागरिकांचा प्रश्न ऐरणीवर

अल्ट्रा चॅम्पियन ” विशाल वळवीच्या उत्कृष्ट कामगिरीचा आदिवासी बांधवांकडून सन्मान.

अतिवृष्टीमुळे सांबरपाड्याचा एकमेव रस्त्यावर दरड कोसळून; ग्रामस्थांची मोठी गैरसोय, आमदारांना दिलेल्या निवेदनानंतरही कार्यवाही नाही

विक्रमगड आठवडे बाजाराला भरभरून प्रतिसाद मात्र शौचालयाची असुविधा – जनतेसाठी मोठा प्रश्न ?

मोखाडा तालुक्यातील १० वी-१२ वी च्या विद्यार्थ्यांना आनंददायी परीक्षेसाठी वैशाली पाटील यांचे मार्गदर्शन.

रोमहर्षक सामन्यात के के किंग 11संघाची बाजी.

दुसऱ्या फ्रीस्टाईल स्केट कार्टींगच्या नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये मोखाडा तालुक्यातील गाडर भगिनींनी पटकवाले दोन गोल्ड व एक ब्रॉन्झ मेडल्स.

पालघर: एसटीच्या लहरी कारभारामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात; परीक्षेलाही पोहोचण्यास होतोय उशीर