
जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी शिक्षक व कर्मचाऱ्यांची रत्नागिरीमध्ये बाईक रॅली…..!
जोहार इंडिया न्यूज 24 (प्रतिनिधी )रत्नागिरी .
दि . 21/09/2021 आज रत्नागिरी या ठिकाणी जुन्या पेन्शनची मागणी पूर्णत्वाला जाण्यासाठी शासकीय, निमशासकीय कर्मचारी व शिक्षक कर्मचारी संघटना यांच्या वतीने भव्य बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
सदर रॅली सामाजिक न्याय विभागाच्या सामाजिक न्याय भवना पासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत नेण्यात आली.
यामध्ये शिक्षक संघटनासह सर्व संघटनांचे पदाधिकारी आणि शिक्षक शिक्षिका व कर्मचारी मोठ्या संख्येने होते. जुन्या पेन्शनच्या मागणीच्या अनुषंगाने रॅली दरम्यान मोठ्या प्रमाणात घोषणा देऊन शासनाचे लक्ष वेधण्यात आले.
या रॅलीमध्ये शिक्षक भारतीने राज्यभर सर्वत्र सहभागी होण्याचा निर्णय घेतला होता.
त्यानुसार आज या रॅलीमध्ये कोकण विभागीय अध्यक्ष व कोकण शिक्षक मतदार संघाचे उमेदवार धनाजी पाटील, शिक्षक भारतीचे जिल्हा कार्याध्यक्ष व मुख्याध्यापक सुभाषराव जाधव, जिल्हा कार्यवाह व पतपेढीचे माजी चेअरमन निलेश कुंभार, जेष्ठ कार्यकर्ते लक्ष्मण गावित यांच्यासह माध्यमिक शिक्षक वर्ग मोठ्या संख्येने सहभागी झाला होता.

Total Users : 10829