
प्राचार्या डॉ.सीमा कांबळे “स्त्री शक्ती २०२२” पुरस्काराने सन्मानित…!
जोहार इंडिया न्यूज 24 (प्रतिनिधी )
नवीन पनवेल;-आदर्श शैक्षणिक समूह संचालित श्री.बापूसाहेब डी.डी. विसपुते शिक्षणशास्त्र महाविद्यालय, नवीन पनवेल च्या प्राचार्या अॅड.डॉ.सीमा कांबळे यांना शिक्षण क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्यासाठी भारतीय जनता युवा मोर्चा, महाराष्ट्र राज्य, विद्यार्थी विभागातर्फे ३ ऑक्टोबर २०२२ रोजी “स्त्री शक्ती पुरस्कार २०२२” ने सन्मानित करण्यात आले. भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र प्रदेश चे महासचिव मा.श्री.विक्रांतजी पाटील यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. नवरात्रीच्या पावन सप्ताहामध्ये दरवर्षी शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय व विशेष कार्य करणाऱ्या स्त्रियांना ह्या पुरस्काराने गौरवान्वित करण्यात येते. प्राचार्या डॉ. सीमा कांबळे ह्यांना हा पुरस्कार मिळाल्याबद्दल आदर्श शैक्षणिक समुहाचे चेअरमन व शैक्षणिक संस्था प्रकोष्ठ, भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र राज्य चे प्रदेश सहसंयोजक मा.श्री. धनराजजी विसपुते ह्यांनी त्यांचे अभिनंदन केले व त्यांनी केलेल्या कार्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे .
Total Users : 10828