
श्री गणेश विद्यामंदिर शाळेत नवरात्रौत्सवा निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन..!
जोहार इंडिया न्यूज 24 (प्रतिनिधी )
दिवा (सचिन शेलवले ) श्री गणेश विद्या मंदिर दातिवली दिवा ठाणे या शाळेत नवरात्रौत्सवानिमित्त पहिल्या दिवशी सरस्वती देवी या मूर्तीचे पूजन करून स्टेज सजावट , मंडप तसेच लायटींग ची सोय केली होती .नियमितपणे शाळेतील विद्यार्थी वर्गानुसार आरती माईक , टाळ व ढोलकीच्या तालावर सकाळ संध्याकाळ नियमितपणे म्हणत होते .त्यांच्या बरोबर संस्थेचे पदाधिकारी संस्थेचे सचिव साईनाथ म्हात्रे , दिनेश म्हात्रे , केतकी म्हात्रे मॅडम , गिता म्हात्रे मॅडम हे पदाधिकारी तसेच शाळेतील शिक्षकांच्या सुद्धा सहभाग होता .या नवरात्र उत्सवात नियमितपणे सकाळ संध्याकाळ आरती भजनाचा कार्यक्रम तसेच याच कालावधीत श्री गणेश विद्यामंदिर प्राथमिक , माध्यमिक , उच्च माध्यामिक ,माय मदर इंग्लिश स्कूल तसेच जिजाऊ बाळ संस्कार केंद्र या शाळेतील शिक्षकांनी भोंडल्याचा कार्यक्रम आयोजित केला होता . तसेच माय मदर इंग्लिश स्कूलच्या मुलांनी शिवाजी वर आधारित उत्कृष्ट नाट्य सादर केले होते . तसेच या नवरात्र उत्सवात प्राथमिक श्री गणेश विद्यामंदिर प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व माय मदर इंग्लिश मीडियमच्या तसेच जिजाऊ बाल संस्कार

केंद्र च्या मुलांनी रास दांडिया चा कार्यक्रम सुद्धा आयोजित केला होता तसेच यामध्ये शिक्षकांचा सुद्धा सहभाग होता . सर्व मुलांनी वेगवेगळ्या प्रकारचे गणवेश परिधान करून दांडियाचा मनमुराद आनंद लुटला . सरस्वती देवीची भक्ती
प्रत्येक दिवशी संस्थेचे सचिव साईनाथ म्हात्रे यांच्या हस्ते हार वेणी घालून पूजन, नियमित पणे आरती करून केली जात होती . त्या नंतर प्रसाद दिला जात होता .तसेच मुलांना दररोज संस्थेचे सचिव साईनाथ म्हात्रे हे वर्गानुसार सर्व विद्यार्थ्यांना दररोज गायत्री मंत्र चे महत्व तसेच जप कसे करायचे याचे धडे देत होते .अशा प्रकारे अनेक कार्यक्रमांचे आयोजन या नवरात्रौत्सवात करण्यात आले होते
Total Users : 10828