ji24news

सख्खा लहान भाऊच ठरला पक्का वैरी,मोठ्या भावाचा कोयत्याने खून….!

सख्खा लहान भाऊच ठरला पक्का वैरी,मोठ्या भावाचा कोयत्याने खून. 

जोहार इंडिया न्यूज 24 (प्रतिनिधी )सौरभ कामडी, मोखाडा

दि.७ आँक्टोंबर २०२२.
जव्हार तालुक्यातील न्याहाळे बुद्रक ग्रामपंचायत हद्दीतील चामीलपाड्यात शुक्रवारी सकाळी १०च्या सुमारास सख्या लहान भावानेच मोठ्या भावाचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. पंकज सोन्या वाजे(वय २१) हा शुक्रवारी वसईला कामाला जायला दुचाकी वरुन निघाला असताना लहान भावाने त्याला थांबवुन त्याच्या गळ्यावर कोयत्याने वार करुन त्याचा खून केला.भाऊ रक्ताच्या थारोळ्यात पडलेला पाहून आरोपी निवृत्ती वाजे हा जंगलात फरार झाला.
ह्या घटनेची माहिती मिळताच जव्हार पोलीस घटनास्थळी पोहचून गुन्ह्याचा पंचनामा केला .मृतदेह शवविच्छेदनासाठी जव्हारच्या पतंगशहा कुटीर रुग्णालयात पाठवण्यात आला होता.ह्या खुनाचा अधिक तपास जव्हार पोलिस उपविभागीय अधिकारी प्रशांत परदेशी,पोलिस निरीक्षक आप्पासाहेब लेंगरे करीत आहेत.
पंकज सोन्या वाजे हा वसई तालुक्यातील वालीव हद्दीतील गौराईपाड्यात भाड्याच्या खोलीत पत्नी व मुलासोबत राहत होता.तो तिथे मिळेल ते बिगारी काम करायचा.नवराञीत ४ आँक्टोंबरला मंगळवारी चामीलपाड्यात देवीला केलेला नवस फेडण्यासाठी व गावावरुन काही धान्य आणण्यासाठी आला होता. चामीलपाड्यात त्याचा लहान सख्खा भाऊ आरोपी निवृत्ती वाजे व आई राहते.गुरुवारी राञी भाऊ वसई वरुन आल्याने हे दोघे सख्खे भाऊ जोडीने राञी वांगणपाड्याच्या नदीवर खेकडी पकडायला गेले होते.बाईक वांगणपाड्यात ठेवुन खेकडी पकडल्या. शुक्रवारी खेकडी बनवल्या होत्या.मोठा भाऊ पंकज लहान भावाला कामासाठी वसईला येण्याचा आग्रह करत होता.परंतु लहान भाऊ निवृत्ती तिकडे कामासाठी येण्यास तयार नव्हता.परंतु शुक्रवारी पंकज वसईला निघाल्यावर त्याच्याबरोबर जायला तयार झाला होता.मात्र भावाला पुढे दुचाकीवर काढून चामील पाड्यातील पाण्याच्या टाकीजवळ निवृत्ती कोयता घेऊन दबा धरुन बसला होता.त्याने भावाला तिथे थांबवुन त्याच्याशी बोलत असताना निवृत्तीने पंकजच्या गळ्यावर कोयत्याने वार केले.तो रक्ताच्या थारोळ्यात पडताच आरोपी निवृत्ती सोन्या वाजे(वय १९) हा खून करुन जंगलात फरार झाला.मयत पंकज सोन्या वाजे(वय२१) यांच्या पश्चात्य त्याची पत्नी, ७ महिने ११दिवसाचा मुलगा व आई अशा परिवार आहे.परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून , अद्याप खूनाचे नेमके कारण कळाले नसुन जव्हार पोलिस अधीक्षक  खूनाचा अधिक तपास करीत आहेत.

ji24news
Author: ji24news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Panchang

Gold & Silver Price

Top News

Advertisement

Our Visitor

0 1 0 8 2 9
Total Users : 10829

Covid Update

जि.प.उच्च प्राथ.शाळा बांधण शाळेत अक्षरधारा फाउंडेशन ट्रस्ट मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेतील होतकरू व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक शाहित्य.

आदिवासी हक्क संघर्ष समितीच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात संपन्न…

20 वर्षांपासून पुलाची प्रतीक्षा; हिरडपाडा ग्रामस्थांचा मतदान बहिष्काराचा इशारा.लेंडी नदीवरील कायमस्वरूपी पुलासाठी दोन दशकांचा संघर्ष; ८ हजार नागरिकांचा प्रश्न ऐरणीवर

अल्ट्रा चॅम्पियन ” विशाल वळवीच्या उत्कृष्ट कामगिरीचा आदिवासी बांधवांकडून सन्मान.

अतिवृष्टीमुळे सांबरपाड्याचा एकमेव रस्त्यावर दरड कोसळून; ग्रामस्थांची मोठी गैरसोय, आमदारांना दिलेल्या निवेदनानंतरही कार्यवाही नाही

विक्रमगड आठवडे बाजाराला भरभरून प्रतिसाद मात्र शौचालयाची असुविधा – जनतेसाठी मोठा प्रश्न ?

मोखाडा तालुक्यातील १० वी-१२ वी च्या विद्यार्थ्यांना आनंददायी परीक्षेसाठी वैशाली पाटील यांचे मार्गदर्शन.

रोमहर्षक सामन्यात के के किंग 11संघाची बाजी.

दुसऱ्या फ्रीस्टाईल स्केट कार्टींगच्या नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये मोखाडा तालुक्यातील गाडर भगिनींनी पटकवाले दोन गोल्ड व एक ब्रॉन्झ मेडल्स.

पालघर: एसटीच्या लहरी कारभारामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात; परीक्षेलाही पोहोचण्यास होतोय उशीर