
महाराष्ट्र फुटबॉल संघ निवड समितीत सोनोपंत दांडेकर महाविद्यालयाच्या प्रा किरण थोरात यांची निवड…..!
जोहार इंडिया न्यूज 24 (प्रतिनिधी )सोमनाथ सातपुते.
पालघर .नाईन ए साईड हॊशी फुटबॉल असोसिएशन महाराष्ट्र संघटने मार्फत महाराष्ट्र राज्याच्या सब ज्युनियर मुलांची निवड चाचणी विभागीय क्रीडा संकुल औरंगाबाद येथे 30 ऑक्टोबर रोजी होणार आहे
या निवड चाचणीस सकाळी 10 वाजता सुरुवात होईल. या करीता राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातून किमान तीन ते पाच खेळाडू सहभागी होणार आहेत या निवड चाचणीचे उद्घाटन औरंगाबाद जिल्हा ऑलम्पिक संघटनेचे अध्यक्ष पंकज भारसाकळे यांच्या हस्ते होणार आहे ,या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नाईन ए साईड फुटबॉल संघटनेचे अध्यक्ष राजेन्द्र पवार ह्यांच्या सह जिल्हा क्रीडा अधिकारी चंद्रशेखर घुगे, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्राप्त महासचिव प्रा एकनाथ साळुंखे ,उपाध्यक्ष, सतीश पाठक उपस्थित राहणार आहेत, या निवडचाचणीस राज्यातून डॉ सुनील पांढरे(बीड) प्रा किरण थोरात (पालघर) विजय शर्मा (मुंबई) बाळकृष्ण सोनवणे(जळगाव) हे निवड समितीचे कामकाज पाहणार आहेत निवड झालेल्या खेळाडूंचा संघ देवास मध्यप्रदेश येथे राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व करेल
Total Users : 10829