
-स्थलांतरण रोखण्यासाठी आधी रोजगार उपलब्ध करावेत. राज्यपाल भगत सिंह कोश्यारी याचे प्रतिपादन….!
जोहार इंडिया न्यूज 24 (प्रतिनिधी )दीपक भोये विक्रमगड mob. no.9226991241
पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील कातकरी समाजातल्या तरुणांनी स्वयंरोजगारासाठी विशेष प्रयत्न होणे आवश्यक असून त्यासाठी शासकीय यंत्रणा तसेच समाजातल्या प्रत्येक घटकांसाठी कार्यरत राहिले पाहिजे अशी अपेक्षा महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आपल्या भाषणात व्यक्त केले. कातकरी आदिम समाज हा नेहमी रोजगारासाठी स्थलांतरित होत असल्यामुळे या समाजाचा विकास खुंटला आहे. त्यामुळे कातकरी समाजाला स्थानिक ठिकाणी रोजगार उपलब्ध करून देण आवश्यक असून त्यासाठी स्थानिक प्रशासनाने योग्य अंमलबजावणी करावी असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारीयांनी वाडा येथे बोलताना सांगितले.
गुरुवारी राज्यपाल पालघर दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी जिल्ह्यातील कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली. कातकरी समन्वय समिती व लोकविकास मंडळ यांच्यावतीने गुरुवारी वाडा येथील स्वामी विवेकानंद महाविद्यालयाच्या मैदानावर कातकरी समाजाच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री पालघरचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण खासदार राजेंद्र गावित याच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक लोकविकास मंडळाचे अध्यक्ष रवींद्र भुरूकुंडे यांची व सूत्रसंचालन संतोष साठे यांनी केले. आभार प्रदर्शन कातकरी समन्वय समिती रमेश सावरा यांनी केले. या मेळाव्यासाठी पालघर नाशिक ठाणे या जिल्ह्यातील बांधव सहभागी होते.

Total Users : 10829