
विक्रमगड पंचायत समिती सभापतीपदी यशवंत कनोजा उपसभापतीपदी विनोद केशव भोईर…
जोहार इंडिया न्यूज 24 (प्रतिनिधी ) दीपक भोये विक्रमगड
विक्रमगड पंचायत समितीचे सभापती व उपसभापती ची निवडणूक शुक्रवारी पार पडली. या निवडणुकीमध्ये साखरे गणातून राष्ट्रवादीकडून निवडून आलेले यशवंत कणोजा याची बिनविरोध निवड झाली. उपसभापतीपदी तर आलोंडे गणातून अपक्ष व (जिजाऊ संघटना )निवडून आलेले विनोद केशव भोईर याची निवड झाली.
राष्ट्रवादीची संख्या बळ अधिक असल्यामुळे सभापती पदासाठी एकमेव अर्ज आल्यामुळे महाविकास आघाडी एक मत होऊन राष्ट्रवादीचे यशवंत कनोजा याची बिनविरोध निवड झाली. उपसभापती पदासाठी निवडणुकीत विनोद केशव भोईर यांना ७ मते मिळाल्याने ते निवडून आले.

Total Users : 10828