
क्रांतीसुर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्ताने मोखाडा तालूक्यातील शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा – हिरवे येथे विविध स्पर्धांचे आयोजन…
जोहार इंडिया 24 न्यूज प्रतिनिधी
मोखाडा ग्रामीण – सचिन वझरे
क्रांतीसुर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्ताने मोखाडा तालूक्यातील शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा हिरवे येथे शाळेचे मुख्याध्यापक श्री. एन.पी.सोनवणे यांच्या नेतृत्वात शाळेत वारली चित्रकला,रांगोळी स्पर्धा, मेहंदी स्पर्धा इ.स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धेच्या आयोजन प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे मुख्याध्यापक श्री.एन.पी.सोनवणे यांच्या हस्ते दिपप्रज्वलनव पुष्प अर्पण करून क्रांतिसूर्य,धरती आबा – बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे मान्यवरांनी पूजन केले.
यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणांमधून क्रांतीसुर्य बिरसा मुंडा यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकला. तसेच आदिवासी गीते ही सादर करण्यात आली. यावेळी प्राथमिक विभागाचे शिक्षक श्री डी एस नंदन सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री. वलपतके सर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. डी.डी.भुसारे यांनी केले तर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन कलाशिक्षक श्री विलास देवळे यांनी केले

Total Users : 10829